रंजन गोगोई कॉंग्रेसवर संतप्त

रंजन गोगोई कॉंग्रेसवर संतप्त
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : संसद अधिवेशन काळातील गदारोळावरून राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती जगदीप धनकड आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यातील पत्रव्यवहार चर्चेत असताना राज्यसभा खासदार रंजन गोगोई यांनी घटनात्मक पदाच्या अनादरावरून कॉंग्रेसवर टिकास्त्र सोडले आहे. काँग्रेसने सभापतींच्या शिष्टाचाराची खिल्ली उडवली असल्याचा टोला माजी सरन्यायाधीश व खासदार गोगोई यांनी लगावला.

हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभा सभापतींची नक्कल तृणमूल कॉंग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केली होती  आणि त्यांचे व्हिडीओ चित्रीकरण कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी केले होते. यावरून सभापती धनकड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यापार्श्वभूमीवर, रंजन गोगोई यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल असताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान वाकलेले असल्याचा जुना फोटो सोशल मिडियावर पोस्ट करून कॉंग्रेसवर शरसंधान केले. हा त्यांचा (धनकड यांचा) स्वभाव असून समोर कोण हे त्यांच्याठी महत्त्वाचे नाही असे रंजन गोगोई यांनी म्हटले आहे.

कल्याण बॅनर्जी यांनी नक्कल केल्यावरून वाद तापल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याचे खापर राहुल गांधींच्या व्हिडीओ चित्रीकरणावर फोडले होते. राहुल गांधींनी हा व्हिडिओ बनवला नसता तर कदाचित इतका व्हायरल झाला नसताअशी टिप्पणी ममतांनी केली होती. तर, राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांनी हा घटनात्मक पदाचा अपमान असल्याचे फटकारले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news