पुढारी ऑनलाईन डेस्क : 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'ला (आरबीआय) मंगळवारी (दि. २६) बॉम्ब हल्ल्याची धमकी देणारा ईमेल आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या राजीनाम्याची मागणी यामध्ये करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी आज (दि. २६) आरबीआय, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या कार्यालयांवर हल्ला करणार असल्याचा अज्ञात इमेल आल्याचे सांगितले. धमकीचा मेल पाठवणाऱ्याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पोलीस या इमेलचा अधिक तपास करत आहेत. मात्र या धमकीनंतर आता मुंबई पोलिसांसह केंद्रीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.
हेही वाचा