पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीकरांसाठी सध्या वायू प्रदुषण ही गंभीर समस्या बनली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथे सरकारकडून निर्बंधही लावण्यात आले होते. मात्र आज यातील काही निर्बंध हटवण्यात येत असल्याची माहिती एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनने दिली आहे. त्यामुळे दिल्लीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राजधानी दिल्ली एनसीआर आणि आसपासच्या परिसरातील हवा 'गंभीर श्रेणी'तून 'अत्यंत खराब श्रेणी'त आली. हवा गुणवत्ता, हवामान अंदाज आणि संशोधन विभागानुसार राजधानी नवी दिल्लीत हवेच्या गुणवत्ता निर्देशांकांत घसरण झाल्याची नोंद करण्यात आली. एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनने (CAQM) शनिवारी (दि. १८) दिल्लीतील वायू प्रदूषणाचा आढावा घेऊन काही निर्बंध मागे घेतले आहेत. दिल्लीसह आसपासच्या भागातील हवेतील प्रदूषणाचा अभ्यास करुन चौथ्या स्टेजमधील निर्बंध शिथील केले जातील. मात्र वायू प्रदूषणाचे संकट अद्याप गंभीर असल्याने तिसऱ्या स्टेजमधील निर्बंध लागू राहतील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा