S.Venkitaramanan Passed Away: RBI चे माजी गव्हर्नर एस. वेंकटरमणन यांचे निधन

S.Venkitaramanan Passed Away
S.Venkitaramanan Passed Away
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर एस वेंकटरमणन यांचे शनिवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी वयाच्या ९२ व्या वर्षा अखेरचा श्वास घेतला. व्यंकटरमणन हे RBI चे १८ वे गव्हर्नर होते. १९९० ते १९९२ पर्यंत त्यांनी RBI गव्हर्नर म्हणून पद भूषवले. (S.Venkitaramanan Passed Away)

एस वेंकटरामनन यांचा जन्म 1931 मध्ये नागरकोइल येथे झाला, जो त्यावेळच्या त्रावणकोर संस्थानाचा भाग होता. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली गिरिजा आणि सुधा असा परिवार आहे. त्यांची मुलगी गिरिजा वैद्यनाथनक या तामिळनाडूच्या माजी मुख्य सचिव होत्या. १९८५ ते १९८९ या काळात त्यांनी वित्त मंत्रालयात वित्त सचिव म्हणूनही काम केले आहे. देशासमोर पेमेंटचे गंभीर संकट असताना त्यांनी देशाच्या मध्यवर्ती बँकेचा कार्यभार स्वीकारला  (S.Venkitaramanan Passed Away)

वेंकटरमणन यांच्या कार्यकाळाचे आपल्या वेबसाइटवर वर्णन करताना, आरबीआयने म्हटले की, 'त्यांच्या कार्यकाळात देशाला जागतिक आघाडीवर प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. त्यांच्या व्यवस्थापनाने देशाला पेमेंट संतुलनाच्या संकटातून बाहेर काढले. त्यांच्या कार्यकाळात, भारताने IMF चा स्थिरीकरण कार्यक्रम स्वीकारला, जिथे रुपयाचे अवमूल्यन झाले आणि आर्थिक सुधारणा कार्यक्रम सुरू केला गेला. (S.Venkitaramanan Passed Away)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news