पुढारी ऑनलाईन डेस्क : स्कॉच व्हिस्की पिणारे लोक हे सुशिक्षित आणि उच्चवर्गातील आहेत, त्यांना दोन ब्रँडमधील फरक कळतो, असे मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने म्हटले आहे. इंपिरियल ब्लू आणि ब्लेंडर्स प्राईड ही व्हिस्की बनवणारी कंपनी प्रेनॉर्ड रिकार्ड इंडियाने, लंडन प्राईड या व्हिस्कीची कंपनी जे. के. इंटरप्राईज विरोधात न्यायालयात दावा दाखल केला होता. उच्च न्यायालयाने प्रेनॉर्ड रिकार्ड इंडियाचा हा दावा फेटाळून लावला आहे. (scotch whiskey)
जे. के. इंटरप्राईज ही कंपनी ब्लेंडर्स प्राईड आणि इंपिरिअल ब्लू या ब्रँडची नक्कल करते, असा दावा प्रेनॉर्ड रिकार्डने केला होता. ब्लेंडर्स प्राईडचे ट्रेडमार्क आणि इंपिरिअल ब्लूच्या बाटलीची नक्कल केली जात आहे, त्यातून ग्राहकांची फसवणूक होते, त्यामुळे जे. के. इंटरप्राईजच्या लंडन प्राईडया ब्रँडवर निर्बंध लादावेत, असे या दाव्यात म्हटले होते. ही बातमी बार अँड बेंचने दिली आहे. (scotch whiskey)
न्यायमूर्ती सुश्रुत अरविंद धर्माधिकारी आणि प्रणय वर्मा यांनी प्रेनॉर्ड रिकार्ड या कंपनीचा दावा फेटाळून लावला. ते म्हणाले, "यातील दोन ब्रँड हे प्रिमियम आणि अल्ट्रप्रिमिअम प्रकारातील आहेत, आणि याचा ग्राहक का सुशिक्षित आहे. हा ग्राहक ब्लेंडर्स प्राईड, इंपिरिअल ब्लू आणि लंडन प्राईड यातील फरक सहज ओळखू शकतो."
तसेच ब्लेंडर्स प्राईडच्या बाटलीच्या रचनेची हुबेहुब नक्कल लंडन प्राईडने केली आहे, असेही दिसत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच प्रेनॉर्ड रिकार्ड या कंपनीने ब्रँडमधील रंगसंगतीबद्दल कोणतीही नोंदणी केलेली नाही, शिवाय ब्लेंडर्स प्राईड हे ट्रेडमार्क जरी नोंद असले तरी प्राईड हा शब्द ट्रेडमार्क म्हणून नोंद नाही असेही न्यायालयाने म्हटले आहे.
हेही वाचा