२० जागांसाठी एकूण २२३ उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यासाठी निवडणूक आयोगाने ५३०४ मतदान केंद्रे स्थापन केली आहेत. या टप्प्यात ४० लाख, ७८ हजार, आणि ६८१ मतदार आहेत. यामध्ये १९ लाख, ९३ हजार, ९३७ पुरुष मतदार तर २० लाख, ८४ हजार, ६७५ महिला मतदार आहेत.
भारतीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, ९० सदस्यीय विधानसभेच्या निवडणुकीत १९,८३९ सेवा मतदारांसह एकूण २,०३,८०,०७९ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार राज्यात ७९० लिंग मतदार आणि १,६०,९५५ अपंग मतदार आहेत.छत्तीसगडमध्ये १८-१९ वयोगटातील २,६३,८२९ मतदार आहेत. राज्यात ८० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या १,८६,२१५ आहे. मतदान पॅनेलने सांगितले की, २०१८ मध्ये २३,६६७ मतदान केंद्रांच्या तुलनेत राज्यात २४१०९ मतदान केंद्रे असल्याचे सांगितले.
राज्यात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका पार पाडण्यासाठी, राज्यातील स्थानिक पोलिस दल वाढवण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPFs) तैनात करण्यात आले आहेत. कांकेरच्या जिल्हाधिकारी प्रियंका शुक्ला यांनी सांगितले की, "यावेळी सर्वाधिक नक्षलग्रस्त भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे, तर काही मतदान केंद्रांवर ड्रोननेही नजर ठेवली जाईल."कांकेर आणि अंतागडमध्ये दोन विशेष कक्ष तयार करण्यात आले आहेत. कांकेरहून सर्वाधिक नक्षलग्रस्त भाग असलेल्या भानुप्रतापपूर विधानसभा मतदारसंघात पथके पाठवण्यात आली आहेत.
छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील २० जागांसाठी आज (दि.७) मतदान सुरू असताना सुकमा येथे नक्षलवाद्यांनी स्फोट केला आहे. या स्फोटात निवडणूक कर्तव्यावर असलेला CRPF जवान जखमी झाला असल्याची माहिती मिळत आहे. सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांनी सांगितले की, सुकमाच्या तोंडामार्का भागात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या IED स्फोटात CRPF CoBRA बटालियनचा एक जवान जखमी झाला आहे. जवान निवडणूक ड्युटीसाठी तैनात होते, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा