पुढारी ऑनलाईन: संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या कालावधित घेण्यात येणार आहे, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी त्यांच्या 'X' अकाऊंटवरून (पूर्वीचे ट्विटर) या संदर्भातील पोस्ट केली आहे. मात्र सत्ताधारी मोदी सरकारकडून हे अधिवेशन का बोलावले आहे? या मागे काय कारण आहे? हे मात्र गुलदस्त्यात आहे. (Parliament Special Session)
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सतराव्या लोकसभेचे 13 वे अधिवेशन आणि राज्यसभेचे 261वे अधिवेशन १८ ते २५ सप्टेंबर दरम्यान होत आहे. या कालावधीत एकूण ५ बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. अमृत कालच्या याअधिवेशन काळातसंसदेत फलदायी चर्चेची अपेक्षा आहे, आहे, असेही जोशी (Parliament Special Session) यांनी म्हटले आहे.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदीय अधिवेशना संदर्भातील अजेंड्यात अमृतकाळ उत्सव आणि भारत एक 'विकसित राष्ट्र' म्हणून समाविष्ट होण्याची शक्यता आहे. पण या विशेषा दरम्यान कोणते महत्त्वाचे विधेयक मंजूर होण्याचा कोणताही संकेत नाही (Parliament Special Session), असे देखील सूत्रांनी म्हटले असल्याचे वृत्त NDTV ने दिले आहे.