पुढारी ऑनलाइन डेस्क : Super moon & Chandrayan 3 : चांद्रयान ३ ने १ ऑगस्टच्या मध्यरात्री पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला. विशेष म्हणजे १ ऑगस्टला पौर्णिमा होती आणि या पौर्णिमेला सुपरमून दिसणार होता. वर्षातील काही ठाराविक काळात आपल्याला सुपरमून दिसतो. यावर्षी २०२३ मध्ये ऑगस्ट महिन्यात दोन पौर्णिमा येत आहेत. पहिली पौर्णिमा १ ऑगस्टला आणि दुसरी पौर्णिमा ३० ऑगस्टला. विशेष म्हणजे या दोन्ही पौर्णिमेला चंद्र हा नेहमीपेक्षा १४ पट अधिक मोठा दिसतो. कारण या काळात चंद्र हा पृथ्वीच्या जवळ आलेला असतो. त्यामुळे चांद्रयान ३ आणि सुपरमूनचा काय संबंध आहे हा प्रश्न समोर येत आहे.
जेव्हा आपल्याला सूपरमून पाहायला मिळतो तेव्हा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आलेला असतो. काल १ ऑगस्टला चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर ३ लाख ५७ हजार ५३० किमी इतके होते. तर जुलैमध्ये जेव्हा २-३ दरम्यान सुपरमून दिसले होते मात्र त्यावेळी चंद्र हा ३ लाख ६१ हजार ९३४ किमी इतक्या अंतरावर होता. या ऑगस्टमध्ये दोन पौर्णिमा येत आहे. येती पौर्णिमा ३० ऑगस्टला येणार आहे. विशेष बाब म्हणजे यावेळी चंद्र पृथ्वीपासून सगळ्यात जवळच्या अंतरावर (Super moon & Chandrayan 3) असणार आहे. 30 ऑगस्टला चंद्र ३ लाख ५७ हजार ३४४ किमी अंतरावर असणार आहे. त्यामुळे या दिवशी ऑगस्ट महिन्यातील दुसरे सुपरमून पाहायला मिळेल. यालाच ब्लू मून देखील म्हणतात.
चंद्र नंतर पुन्हा २८-२९ सप्टेंबरला पुन्हा पृथ्वीच्या जवळ असेल. तेव्हाही सुपरमून दिसणार आहे. मात्र, तेव्हा त्याचे पृथ्वी पासूनचे अंतर ३ लाख ६१ हजार ५५२ किमी असणार आहे. थोडक्यात पाहायचे झाले तर ऑगस्टमध्ये दिसणारे दोन्ही सुपरमून हे पृथ्वीपासून सर्वात जवळच्या अंतरावर असणार आहे. याचा फायदा चांद्रयान ३ ला कसा मिळेल हे पाहणे रंजक ठरेल.
सध्या चांद्रयान ३ ने पृथ्वीची कक्षा १ ऑगस्टच्या रात्री सोडली आहे. म्हणजे सुपरमूनच्या २४ तास आधी चांद्रयान ३ ने चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला. चांद्रयान ३ सध्या २८८ किमीच्या पेरीजी आणि ३ लाख ६९ हजार ३२८ किलोमीटरच्या एपोजीच्या कक्षेत प्रवास करत आहे. अर्थात चांद्रयान ३ जर चंद्राच्या ग्रॅव्हिटीला पकडू शकले नाही तर तो त्याची १० दिवसाची यात्रा करून पृथ्वीच्या २८८ किमीच्या पेरीजीमध्ये पुन्हा परत येईल. मात्र, चांद्रयान प्रवास करत आहे तो काळ दोन सूपरमूनच्यामधील काळ आहे. त्यामुळे या काळा चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर कमी असणार आहे. ज्याचा फायदा चांद्रयान ३ ला निश्चितच होईल. कारण चांद्रयान ३ ला जास्त अंतर काावे लागणार नाही.
चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर एका ठाराविक मर्यादेत कमी जास्त होत राहते. सामान्यपणे हे अंतर पृथ्वीपासून ३.६० किलोमीटर ते ४ लाख किलोमीटर इतके असते. त्यामुळे इस्रोच्या वैज्ञानिकांनी दोन सुपरमूनच्या मधील कालावधी लक्षात घेऊन चांद्रयान ३ लाँच केले. जेणेकरून चंद्र दोन वेळा पृथ्वीच्या जवळ असेल. त्यामुळे जितके अंतर कमी तितकाच वेळ, इंधन आणि पर्यायाने खर्च कमी पडतो. अन्यथा जास्त इंधनाची गरज असते. जास्त वेळ लागतो. अशात रिस्क वाढते.
चंद्र या महिन्यात पृथ्वीच्या जवळ असेल हे लक्षात घेऊन त्याचा फायदा इस्रोच्या वैज्ञानिकांनी उचलला आहे. चांद्रयान ३ यावेळी ३८ हजार ५२० किलोमीटर प्रतितास या गतिने चंद्राच्या दिशेने पुढे प्रवास करत आहे. याची गती दररोज कमी केली जाईल. जेणेकरून ज्यावेळी चंद्राजवळ यान पोहोचेल अर्थात त्याच्या पृष्ठभागापासून ११ हजार किलोमीटरच्या अंतरावर असताना जिथे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण शून्य असते. याला L1 पॉइंट असेही म्हटले जाते.
चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा ६ पट कमी आहे. त्यामुळे देखील चांद्रयान ३ ची गती कमी करावी लागणार आहे. अन्यथा त्याला चंद्राच्या कक्षेत प्रवेश करता येणार नाही. असे झाल्यास चांद्रयान ३.६९ लाख किलोमीटरवरून पुन्हा पृथ्वीवरील ५ व्या कक्षेतील पेरीजीच्या अर्थात २८८ किलोमीटर लांब १० दिवसात परत येईल.
चांद्रयान ३ ची गती ५ ऑगस्टपासून ते २३ ऑगस्टपर्यंत चंद्रयान ३ ची गती सातत्याने कमी करण्यात येईल. जेणेकरून चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या हिशोबाने पाहिले तर चांद्रयान ३ ची गती खूप जास्त आहे. याला कमी करण्यासाठी १ किलोमीटर प्रति सेकंद इतकी गती कमी करावी लागेल. अर्थात ३६०० किलोमीटर प्रतितास या गतीने चांद्रयान चंद्राच्या ऑर्बिटला पकडेल. नंतर हळूहळू त्याला दक्षिणी ध्रुवावर उतरवण्यात येईल.
हे ही वाचा :