Kerala : बायकोला घाबरून पळाला; वर्षभराने सुखरूप सापडला | पुढारी

Kerala : बायकोला घाबरून पळाला; वर्षभराने सुखरूप सापडला

कोझिकोड ः ही घटना केरळमधील आहे. त्याचे असे झाले की, नौशाद याचा विवाह अफसानाशी झाला होता. काही काळ दोघे सुखात नांदले. मात्र, नंतर अचानकपणे नौशाद बेपत्ता झाला. तशी तक्रार पोलिसांत देण्यात आली. जवळपास दीड वर्ष त्याचा ठावठिकाणा कुणालाच कळला नाही. अफसाना तर पती मेल्याची द्वाही फिरवून मोकळी झाली. कर्मधर्मसंयोगाने तोडुपुझा या छोट्या गावात पोलिसांना नौशाद सापडला. यानंतर त्यांना धक्काच बसला. कारण, अफसानाने तर त्याचा खून होऊन दफनविधीसुद्धा झाल्याचे सांगितले होते. यानंतर पोलिसांनी सर्वप्रथम अफसानाच्या मुसक्या आवळल्या. नंतर नौशादची चौकशी केली असता, पत्नीला घाबरून आपण घरातून पळ काढल्याचे त्याने सांगितले. पत्नी काही लोकांना घरी बोलावून मला त्यांच्याकरवी मारहाण करायची, अशी आपबीती त्याने उघड केली तेव्हा पोलिसांना खरा प्रकार समजला आणि त्यांनी डोक्यावर हात मारला.

हेही वाचा : 

Back to top button