नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : वैवाहिक बलात्काराला (Marital Rape) गुन्ह्याच्या श्रेणीत आणण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास आणि याचिका सूचिबद्ध करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे. तूर्त न्यायालयाने सुनावणीसाठी कुठली तारीख निश्चित केलेली नाही. याचिकाकर्त्यांचा वतीने वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंह आणि करूणा नंदी यांनी याचिकांवर तात्काळ सुनावणीची मागणी केली होती. सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी वैवाहिक बलात्कार गुन्हा आहे की नाही? हे ठरण्यासाठी याचिकांवर सुनावणी घेण्यासंबंधी विचार करू,असे स्पष्ट केले आहे.
१६ जानेवारी २०२३ रोजी वैवाहिक बलात्काराला गुन्ह्याच्या श्रेणीत आणावे की नाही,हे निश्चित करू,असे न्यायालयाने स्पष्ट करीत १५ फेब्रुवारीपर्यंत केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते. ( Marital Rape )
काही महिन्यांपूर्वी या प्रश्नी सर्व हितधारकांकडून विचार मागवून घेतले होते.यासंबंधी उत्तर दाखल करण्याची परवागनी केंद्राच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांकडून मागण्यात आली होती.सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड, न्या.पी.एस.नरसिम्हा आणि न्या.जे. बी.पारडीवाला यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली होती.गत १६ सप्टेंबर रोजी वैवाहिक बलात्कार गुन्हा आहे की नाही? यासंबंधी परीक्षण करण्यास न्यायालयाने सहमती दर्शवली होती.यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने ११ मे २०२२ रोजी या मुद्द्यावर खंडित निकाला दिला होता.
हेही वाचा :