नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसचा हात सोडून आता तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल होणार आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांच्या जवळच्या सुत्रांकडून ही माहिती मिळाली आहे.
शत्रुघ्न सिन्हा २१ जुलै रोजी शहीद दिवस कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलमध्ये दाखल होतील, असे सुत्रांचे म्हणणे आहे.
अधिक वाचा :
अभिनेते शत्रुघ्न सिन्हा दोन वर्षापूर्वी भाजपमधून बाहेर पडून काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. तब्बल तीन दशकांहून अधिक काळ ते भाजपसोबत राहिले होते.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही भूषवलं होतं. पण त्यांनी नाराजी व्यक्त करत भाजपला रामराम केला आणि काँग्रेसचा हात धरला होता.
अधिक वाचा :
सिन्हा यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन करणारे ट्विट केले होते. त्यानंतर ते भाजपमध्ये घरवापसी करतील अशी अटकळ बांधण्यात आली होती. मात्र, ते तृणमूल काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु आहे.
सिन्हा याबाबत विचारले असता त्यांनी काही सांगण्यास स्पष्ट नकार दिला. पण राजकारण ही संभाव्यता शोधण्याची कला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
अधिक वाचा :
बिहारी बाबू नावाने प्रसिद्ध असलेल्या सिन्हा यांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकीदरम्यान ममता बॅनर्जी यांचे कौतुक केले होते.
ममता ह्याच बंगालच्या खऱ्या वाघीण आहेत, असे त्यांनी म्हटले होते.
शत्रुघ्न सिन्हा पटना साहिब लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळा खासदार राहिले आहेत.
२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत त्यांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. पण माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी त्यांचा पराभव केला होता.
हे ही वाचा :
पहा व्हिडिओ :