रजनीकांत यांचा राजकारणात येण्यापूर्वी रामराम! संघटनाही केली बरखास्त

रजनीकांत यांनी राजकारणाच्या दिशेने सुरू केलेला प्रवास अखेर थांबवला
रजनीकांत यांनी राजकारणाच्या दिशेने सुरू केलेला प्रवास अखेर थांबवला
Published on
Updated on

चेन्नई; पुढारी ऑनलाईन : रजनीकांत यांनी राजकारणात येण्यापूर्वीचं त्या दिशेने सुरू असलेला प्रवास थांबवला आहे. रजनीकांत अनेक वर्षांपासून राजकारणात येणार असल्याची चर्चा होती. या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे.

अधिक वाचा- 

रजनीकांत यांनी त्यांची रजनी मक्कल मंदरम संघटनादेखील बरखास्त केली आहे. निवडणूक न लढवण्याची घोषणा करत यापुढे राजकारणात येणार नाही. असे त्यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा- 

ते म्हणाले, भविष्यात राजकारणात येण्याची कोणतीही योजना नाही. याआधी रजनीकांत म्हणाले होते की, रजनी मक्कल मंदरमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा होईल. मगच, राजकारणात यायचं की नाही, याचा निर्णय घेण्यात येईल.

अधिक वाचा- 

सुपरस्टार रजनीकांत राजकारणात येण्यापूर्वी रामराम
सुपरस्टार रजनीकांत राजकारणात येण्यापूर्वी रामराम

हा पक्ष २०१८ मध्ये अस्तित्वात आला. रजनीकांत यांच्या रजनी मक्कल मंदरमला राजकीय पक्षासाठी लॉन्च व्हिकल मानले जात होते.

आरोग्याचा हवाला देत राजकारणापासून दूर

मागील वर्षाच्या शेवटी त्यांनी आरोग्याचे कारण दिले होते. त्यावेळी तुर्तास राजकारणा येणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

२०१६ मध्ये त्यांचे किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आलं होतं. त्यांनी राजकारणार येणार नसल्याची घोषणा केली होती.

त्यांनी एक स्टेटमेंट जाहीर केलं होतं. रजनीकांत यांनी लिहिलं होतं. मी राजकारणात न येण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, कोविड – १९ काळ सुरू आहे. निवडणूक अभियानाच्यावेळी लोकांची गाठभेट होणार नाही.

ते म्हणाले, काही लोक माझ्यावर टीका करू शकतात. मी कोणतेही जोखीम घेण्यास तयार नाही. मी हा निर्णय घेतल्यानंतर खूप वाईट वाटलं.

हे ही वाचलत का? 

पाहा व्हिडिओ – 

कोण होणार मराठी करोडपती निमित्त अभिनेते सचिन खेडेकर यांच्याशी खास बातचीत

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news