नवी दिल्ली ः पुढारी वृत्तसेवा कोठडीत असलेल्या लोकांची राजरोस हत्या घडवून आणली जात आहे. यावरून आपण चिंतित नाही काय, असा खोचक सवाल खासदार कपिल सिब्बल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विचारला आहे. कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारी याचा जवळचा सहकारी संजीव जीवा याची अलीकडेच लखनौ येथील न्यायालयात पोलिसांसमक्ष गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याचा संदर्भ सिब्बल यांनी दिला आहे. 2017 ते 2022 या कालावधीत 41 लोकांची पोलीस कोठडीत असताना हत्या झाली. हे का आणि कसे? संजीव जीवा याची नुकतीच हत्या झाली.