पेट्रोल-डिझेल दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ - पुढारी

पेट्रोल-डिझेल दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट होऊन डॉलरच्या तुलनेत रुपया वधारुनही सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेल दरात शुक्रवारी प्रत्येकी 35 पैशांची वाढ केली. सलग तिसऱ्या दिवशी करण्यात आलेल्या या दरवाढीमुळे इंधनाचे दर नव्या सर्वकालीन उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडचे प्रति बॅरलचे दर आता 84.85 डॉलर्सवर आले असून डब्ल्यूटीआय क्रूड तेलाचे दर 82.70 डॉलर्सपर्यंत खाली आले आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पेट्रोल-डिझेल दरात वाढ सुरु आहे. विमानाच्या इंधनाच्या तुलनेत पेट्रोल 35.3 टक्क्यांनी जास्त महाग झाले आहे.

पेट्रोल-डिझेल दरात वाढ

ताज्या इंधन दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल चे प्रति लिटरचे दर 112.78 रुपयांवर गेले असून डिझेलचे दर 103.63 रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे देशाची राजधानी दिल्‍लीमध्ये पेट्रोल 106.89 रुपयांवर तर डिझेल 95.62 रुपयांवर गेले आहे. चेन्नई येथे हेच दर क्रमशः 103.92 आणि 99.92 रुपयांवर गेले आहेत. कोलकाता हे दर 107.45 आणि 98.73 रुपयांवर गेले आहेत.

हेही वाचलत का?

Back to top button