पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मिरमध्ये आज भारतीय लष्कराने धडक कारवाई केली. चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. ड्रग्जसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. (Jammu and Kashmir)
एलओसीवर (प्रत्यक्ष नियंत्रण रेषा) मेंढर सेक्टरमध्ये शुक्रवारी (दि.१९) रात्री चकमक झाली. यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले. त्याच्याकडून ड्रग्जसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. परिसरात शोध मोहीम सुरू आहे.
ही वाचा