Tungnath Temple : आशिया खंडातील शिवाचे सर्वात उंच तुंगनाथ मंदिर एका बाजूने झुकले; मंदिर संरक्षणासाठी ASI ला पत्र

Tunganath Temple
Tunganath Temple
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Tungnath Temple : उत्तराखंड स्थित आशिया खंडातील शिवाचे सर्वात उंच मंदिर एका बाजूने झूकत आहे. हे मंदिर समुद्रसपाटीपासून सर्वात उंचीवर आहे. रुद्रप्रयाग जिल्ह्यातील तुंगनाथ मंदिर हे पंच केदारपैकी एक आहे. पंच केदारपैकी तृतीय तुंगनाथ मंदिर म्हणून हे मंदिर ओळखले जाते. हे मंदिर गेल्या काही काळापासून एकाच बाजूने कलत आहे. सध्या ते 5 ते 6 अंशापर्यंत एका बाजूने झुकले आहे. तर मंदिरातील मूर्ती आणि सभामंडप १० अंशांनी झुकले आहे. याबाबत श्रीबदरीनाथ-केदारनाथ मंदिर समिती ने एएसआयला पत्र पाठवले आहे.

या पत्रातून मंदिराचे अध्ययन करून तातडीने संरक्षित करावे असे म्हटले आहे. मंदिरचे मठाधिपती राम प्रसाद मैठाणी यांचे म्हणणे आहे की वर्ष 1991 मध्ये आलेला भूकंप आणि वेळोवेळी आलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे मंदिरावर मोठा परिणाम झाला आहे. (Tungnath Temple) सन 2017-18 मध्ये एएसआयने मंदिराचे सर्वेक्षण करण्यासाठी काचेचे तराजूही बसवले. आता मंदिर झुकत असल्याचा अहवाल विभागाने जारी केला आहे.

1991 च्या उत्तरकाशी भूकंप आणि 1999 चा चमोली भूकंप, 2012 च्या उखीमठ आपत्ती आणि 2013 च्या केदारनाथ आपत्तीने देखील या मंदिराला प्रभावित केले आहे. मंदिराच्या बाहेरील भिंतीपासून अनेक ठिकाणी दगड विखुरलेले आहेत. सभामंडपाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. तसेच गर्भगृहाचा काही भाग झुकला आहे. (Tungnath Temple)

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news