पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटक मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल? या मुद्द्यावर सध्या जोरदार चर्चा आहे. या नव्या मुख्यमंत्री निवडीबाबतची एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा आजच्या काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत कोण ठरवणार यावर एकमताने निर्णय झाला आहे. काँग्रेस आमदारांनी एकमताने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे हा निर्णय़ सोपविल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचा ठराव आजच्या बैठकीमध्ये पास करण्यात आला आहे. (Karnataka New CM)
कर्नाटकात स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यासाठी विधिमंडळ पक्षाची बैठक बंगळुरातील शांग्री-ला हॉटेलमध्ये आज पार पडली. यामध्ये डी.के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यासह ३ निरीक्षक सुशील कुमार शिंदे, दीपक बावरिया आणि भंवर जितेंद्र सिंह यांची उपस्थिती होती. या बैठकीत पक्षनिरीक्षकांनी पक्षश्रेष्ठींनी आपला अहवाल सादर केला. (Karnataka New CM)
मीडिया रिपोर्टनुसार मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची तारीख देखील ठरवण्यात आली आहे. १८ मे ही तारीख या शपथविधीची असू शकते असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या शपथविधी सोहळ्याला सोनिया गांधीं, राहुल गांधी आणि प्रियांका गांधींसह पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते या सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत.
कर्नाटक मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल? कोणाची दावेदारी सर्वाधिक प्रबळ आहे, याबद्दल निकालानंतरच चर्चा सुरू झाली आहे. सध्या या स्पर्धेत सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार हे दोन दिग्गज आहेत.. सिद्धरामय्या यांनी स्वतःच काँग्रेसने अद्याप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नसला तरी शिवकुमार हे या पदाच्या शर्यतीत एक स्पर्धक निश्चितच आहेत, असे स्पष्ट केलेले आहे. कर्नाटकमध्ये निकालापूर्वी काँग्रेस पक्षाने याआधीही मुख्यमंत्र्यांचा चेहरा पडद्याआडच ठेवलेला आहे. निवडून आलेल्या आमदारांच्या मतांनंतरच हायकमांड कोण मुख्यमंत्री त्याबद्दल निर्णय घेतील, असेच यावेळीही ठरलेले आहे. सिद्धरामय्या हे अनुभवी आहेत आणि सरकार चालवण्याचा त्यांना अनुभव आहे. दुसरीकडे, डी. के शिवकुमार यांचेही पक्षासाठीचे योगदान मोठे आहे.
हेही वाचा