‘Mann ki Baat@100’ : ‘मन की बात पाहता पाहता हे जनआंदोलन बनले’, वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले,

mann ki baat @ 100
mann ki baat @ 100
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : मन की बात@१०० व्या भागात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या भागापासून आतापर्यंतचा जो प्रवास आहे. त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. व्होकल फॉर लोकल आणि लोकल फॉर ग्लोबल, बेटी बचाव बेटी पढाव- सेल्फी विथ डॉटर मोहीम, नारी शक्ती, या सर्व मुद्द्यांवर पुन्हा एकदा फोकस केला आहे. यावेळी त्यांनी मन की बात कार्यक्रम पाहता पाहता जनआंदोलन बनले, असे म्हटले आहे.

यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी काही जुन्या भागाच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, एका भागात बराक ओबामा सोबत चर्चा केली होती. त्या भागाची विश्वात सर्वत्र चर्चा झाली.

मन की बात माझ्यासाठी सामान्य लोकांशी जुडण्याचे माध्यम, हजारो लोकांचे संदेश वाचतो, माझ्यासाठी मन की बात हा कार्यक्रम नसून एक आस्था, पूजा, व्रत आहे. मन की बात माझ्या मनाची अध्यात्मिक यात्रा, स्व से वयम् की यात्रा आहे.

जलसंवर्धन, स्वच्छता मोहीम, वनसंवर्धनासाठी झटणाऱ्या लोकांच्या मेहनतीबाबत उल्लेख केला. अशा लोकांशी आपण मन की बातच्या माध्यमातून जोडले गेलो, असे ते म्हणाले. पुढे त्यांचे कौतुक करताना हे सर्व हिरो आहेत. त्यांनी मन की बात कार्यक्रमला जीवंत केले, अशा शब्दात त्यांनी समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्यांचा गौरव केला.

बेटी बचाव बेटी पढाव आंदोलना बाबत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा हरियाणातील सुनील यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी पंतप्रधान यांनी सुनील यांच्याकडून 'सेल्फी विथ डॉटर' अभियानाची माहिती घेतली. सेल्फी विथ डॉटरचा उल्लेख मन की बातमधून केल्यानंतर हे वैश्विक पातळीवरील हे कॅम्पेन बनले. याचा परिणाम हरियाणात आज लिंग समानताचा दर खूप सुधारला आहे. त्यांनी पुन्हा एकदा सुनील यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत त्यांच्या दोन्ही मुलींना शुभेच्छा दिल्या.

देशातील नारीशक्तीच्या शेकडो प्रेरणादायी गोष्टी

छत्तीस गढच्या बचत गटाच्या महिला स्वच्छता मोहीम चालवतात, तमिळनाडूच्या महिलांनी नाग नदीला पुनरुज्जीवित केल्या आहेत, अशा प्रकारे नारी शक्तीच्या कार्याचा गौरव केला.

जम्मू काश्मीरच्या मंजूर यांच्या पेन्सील स्लेट अभियानातून 200 लोकांना रोजगार मिळत आहे. त्यांच्याशी देखील त्यांनी पुन्हा एकदा संवाद साधला.  यावेळी मंजूर यांनी पंतप्रधानांना सांगितले की ते लवकरच आणखी 200 लोकांना रोजगार देणार आहेत. तर मणिपूरच्या विजय शांती ज्या कमळाच्या धाग्यापासून कपडे बनवण्याचे स्टार्ट अप चालवते, तिच्याशी पुन्हा एकदा संवाद साधला. यावेळी त्यांनी व्होकल फॉल लोकल आणि लोकल फॉर ग्लोबलचा पुनरुच्चार केला.

हिलिंग हिमालयाज

प्रदीप सांगवान यांच्या हिलिंग हिमालयाज कॅम्पेनची एका भागात चर्चा करून त्यांच्याशी संवाद साधला होता. आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्याशी संवाद साधला. प्रदीप सांगवान हिमालयाचे स्वच्छता अभियान चालवतात. त्यांच्या प्रयत्नाचे मोदींनी कौतुक केले.

युनेस्कोच्या डीजींकडून कार्यक्रमाचे कौतुक

युनेस्कोच्या डीजींकडून कार्यक्रमाचे कौतुक केले. त्यांनी भारताची लोकसंख्या पाहता एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी 20230 पर्यंत भारतात शिक्षणासाठी कशा प्रकारे प्रयत्न करण्यात येतील याविषयी विचारले. तसेच संस्कृती संवर्धनाविषयी देखील युनेस्कोच्या डीजींनी विचारले, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे दोन्ही विषय मन की बातचे महत्वाचे विषय आहे असे म्हटले, तसेच गुजरात, ओडिसा, झारखंड, तसेच वेगवेगळ्या ठिकाणाहून सुरु असलेल्या वेगवेगळ्या लोकांच्या प्रयत्नाबद्दल सांगितले. तसेच स्टोरी टेलिंगने कशा प्रकारे शिक्षा दिली जाऊ शकते याचा एक भागात केलेले उल्लेख पुन्हा केला. त्याच वेळी उपनिषदांमधील शिक्षणाबद्दल असलेल्या काही ओळी उद्धृत केल्या. तसेच भारतात कशा प्रकारे शिक्षणाविषयी प्रयत्न केले जात आहे, याविषयी सांगितले.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news