पुढारी ऑनलाइन डेस्क : Breaking News : Punjab gas leak case : पंजाबमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. पंजाबच्या लुधियाना शहरात ग्यासपुरा येथे गॅस गळती झाली आहे. अद्ययावत माहितीनुसार किमान 10 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. माहिती मिळताच बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाने जवळपासचा तीनशे मीटरचा परिसर रिकामा केला आहे. ही दुर्घटना सकाळी पावणे आठ वाजता ग्यासपूर रोड येथे सितारा सिनेमा हॉलच्या जवळ घडली.
एएनआयने दिलेल्या सुरुवातीच्या माहितीनुसार, पोलिसांचे म्हणणे आहे की, "किमान 5 जणांचा मृत्यू झाला आहे. 5-6 लोक बेशुद्ध पडले आहेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बचाव पथकाला पाचारण करण्यात आले आहे. डॉक्टर आणि रुग्णवाहिकांच्या टीमलाही पाचारण करण्यात आले आहे." असे म्हटले होते.
तर लुधियाना पश्चिमच्या एसडीएम स्वाती यांनी दिलेल्या नंतर एएनआयला दिलेल्या माहितीनुसार "नक्कीच, हे गॅस गळतीचे प्रकरण आहे. लोकांना बाहेर काढण्यासाठी NDRF टीम घटनास्थळी उपस्थित आहे आणि बचाव कार्य करेल. या घटनेत 9 लोकांचा मृत्यू झाला आणि 11 लोक आजारी आहेत," असे म्हटले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, गॅस गळतीत अनेक पाळीव प्राण्यांचा देखील मृत्यू झाला आहे. दरम्यान पोलिस प्रशासन आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल आहेत.
हे ही वाचा :