Covid-19 Updates | देशात कोरोनाचे २४ तासांत ७,१७८ नवे रुग्ण, १६ मृत्यू

Covid-19 India Updates
Covid-19 India Updates
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ७,१७८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्या ६५,६८३ वर पोहोचली आहे. कोरोना रिकव्हरी रेट ९८.६७ टक्के असल्याची माहिती माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ९.१६ टक्के इतका नोंदवला गेला आहे आणि आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट ५.४१ टक्के आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोरोना लसीचे २२०.६६ कोटी डोस देण्यात आले आहेत.

देशात आठवडाभरात ७३,८७३ रुग्णांची नोंद

शनिवारी संपलेल्या मागील आठवड्यात कोरोनाच्या ७३,८७३ रुग्णांची नोंद झाली. त्याआधीच्या आठवड्यात ६१,५०६ रुग्ण आढळून आले होते. याचाच अर्थ कोरोनाची नवीन लाट शिगेला पोहोचण्याची चिन्हे दिसू लागली आहे. गेल्या आठवडाभरातील ही रुग्णसंख्या ८ महिन्यांतील सर्वाधिक आहे.

केरळनंतर दिल्लीत धोका वाढला

दिल्ली, हरियाणा आणि तामिळनाडूमधील रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. केरळनंतर दिल्लीत रुग्णसंख्या वाढली आहे. येथे गेल्या आठवडाभरात सुमारे १० हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. पण, देशाच्या अनेक भागांमध्ये रुग्ण वाढत असताना देशाच्या पूर्वेकडील राज्यांत रुग्णवाढीचे प्रमाण कमी आहे.

महाराष्ट्रातील रुग्णसंख्येत ३५ टक्क्यांची घट

रविवारी महाराष्ट्रात ५४५ कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी १४१ रुग्ण मुंबईतील आहेत. शनिवारी राज्यात ८५० रुग्ण आढळून आले होते. पण रविवारी रुग्णसंख्येत ३५ टक्क्यांची घट झाली. मुंबई आणि रत्नागिरीत प्रत्येकी एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news