युपीतील माफिया अतीक अहमदचा मुलगा असदसह दोघांचा एन्‍काऊंटर

युपीतील माफिया अतीक अहमदचा मुलगा असदसह दोघांचा एन्‍काऊंटर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशमधील माफिया आणि उमेश पाल हत्‍या प्रकरणातील आरोपी अतीक अहमद याचा मुलगा असद हा पोलिस चकमकीत ठार झाला आहे. त्‍याच्‍याबरोबर गुलाम मोहम्‍मद हाही चकमकीत ठार झाला आहे. या दोघांवर प्रत्‍येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस होते, असे 'एएनआय'ने म्‍हटले आहे.

प्रयागराज येथे २४ फेब्रुवारी २०२३ रोजी उमेश पाल यांची हत्‍या झाली होती. तेव्‍हापासून असद आणि शूटर गुलाम मोहम्मद हे फरार झाले होते. उत्तर प्रदेश पोलिसाचे विशेष कृती दल ( एसटीएफ ) या दोघांच्‍या मागावर होती. पथकाला दोघेही झाशी येथे असल्‍याची गोपनीय माहिती मिळाली होती.  पोलिसांनी त्‍यानुसार सापळा लावला. पोलिसांनी दोघांना शरण येण्‍याचे आवाहन केले. यावेळी दोघांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्‍या प्रत्‍युत्तरात दोघेही ठार झाले. दरम्‍यान,  प्रयागराज न्‍यायालयात अतिकची सुनावणी सुरु असतानाच चकमकीचे बातमी आली समोर आल्‍याने उत्तर प्रदेशमध्‍ये मोठी खळबळ माजली आहे.

उत्तर प्रदेश 'एसटीएफ'ची झाशी येथे धडक कारवाई

उत्तर प्रदेशमधील झाशी येथे 'एसटीएफ'i; पोलीस अधीक्षक नवेंदू आणि पोलीस उपअधीक्षक विमल यांच्या नेतृत्वाखालील पथकाबरोबर झालेल्‍या चकमकीत असद आणि गुलाम मोहम्‍मद ठार झाले. या दोघांकडून विदेशी बनावटीची अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्‍यात आल्‍याची माहिती सूत्रांनी दिली.

उमेश पाल हत्‍या प्रकरणी आज अतिक अहमद याला प्रयागराज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले. यासाठी त्‍याला साबरमती कारागृहातून प्रयागराज न्यायालयात आणण्यात आले होते. उमेश पाल हत्‍या प्रकरणाची न्‍यायालयात सुनावणी सुरु असतानाच अतिक अहमद याचा  मुलगा असद व  त्‍याचा साथीदार गुलाम मोहम्‍मद पोलीस चकमकीत ठार झाल्‍याची बातमी समोर आल्‍याने उत्तर प्रदेशमध्‍ये खळबळ उडाली आहे.

असद होता दीड महिन्‍यांपासून फरार, दिल्‍ली पोलिसांना दिला होता गुंगारा

उमेश पाल हत्‍येनंतर असद अहमद हा दीड महिन्यांपासून फरार होता. तो नेहमी स्‍वत:कडे तीन ते चार शस्त्रे बाळगत असे. तसेच झोपेत असतानाही तो शस्त्र सोबत ठेवायचा. दिल्ली पोलिसांचे विशेष पथकही त्‍याच्‍या मागावर होते. मात्र दिल्‍ली पोलिसांच्‍या विशेष पथक संगम विहारमध्ये पोहोचली. यापूर्वी असद गुलामसोबत फरार झाला होता. स्पेशल सेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, माफिया डॉन अतिक अहमदचा माजी ड्रायव्हर शफीक याने असदच्या दिल्लीत राहण्याची व्यवस्था केली होती. त्याने असदला त्याच्या ओळखीच्या झीशान, खालिद आणि जावेद यांच्याकडे दिल्लीला पाठवले होते. शफीकच्या सांगण्यावरून असदला आपल्या घरात आश्रय दिल्याचे या मदतनीसांनी चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले होते. असद तिघांच्याही घरी राहायचा आणि दोन दिवसांनी घर बदलायचा. संगम विहार येथे मुक्कामादरम्यान आरोपींना शेजाऱ्यांपैकी कोणीही ओळखले नाही.

पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, माफिया डॉनचा मुलगा आणि शूटर असद हा दिल्लीत १५ दिवसांच्या आश्रयादरम्यान या आरोपींच्या घरी थांबले होते. कधी-कधी ते संगम विहारातच फिरायला जायचे. दोन्ही आरोपी संगम विहारच्या बाहेर फिरायला गेले नाहीत. उमेश पालचा खून झाल्यानंतरच हे दोघेही दिल्लीत आले होते. यावेळी असदने त्याचा मोबाईल फोन वापरला नाही. तो उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी साथीदारांच्‍या फोनवरून बोलत असे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news