सिंघु बॉर्डर : कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या लंगरला आग - पुढारी

सिंघु बॉर्डर : कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या लंगरला आग

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन डेस्क : शनिवारी रात्री सिंघु बॉर्डरवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाजवळ आग लागल्याची घटना समोर आली आहे. या दरम्यान लंगरमध्ये काही गॅस सिलिंडर फुटल्याचे आवाज आले आहेत.

शेतकरी आग लागलेल्या ठिकाणी पोहचले, तेव्हा अनेक तंबू जळून खाक झाले होते. लंगरजवळ असलेले चार ट्रकही जळाले होते. ही आग शनिवारी रात्री १० च्या दरम्यान लागली आहे. आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. दुर्घटनेचे कारण अद्‍याप समजू शकलेले नाही.

सिंघु बॉर्डरवर मागिल सात महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे.

चार लाख ट्रॅक्टर्ससह संसदेवर मोर्चा; केंद्र सरकारला शेतकऱ्यांकडून इशारा

कृषी कायद्यांविरोधात सात महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरु आहे.   लाला किल्ला आंदोलनाप्रकरणानंतर आता शेतकरी चार लाख ट्रॅक्टर घेऊन थेट संसदेवर मोर्चा काढणार असल्याचा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे.

‘इथे चार लाख ट्रॅक्टर आणि २५ लाख आंदोलक आहेत. हे सर्व ट्रॅक्टर्स याच देशातील असून ते अफगाणिस्तानमधून आलेले नाहीत. आम्ही मागील सात महिन्यांपासून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. शेतकऱ्यांचं मत ऐकून घेण्याइतकीही सरकारची मानसिकता नाही. लोकशाहीमध्ये अशापद्धतीने काम करता येत नाही, असेही टिकैत म्‍हणाले.

हे ही वाचल का :

ह ही पाहा : कोरोनाचा Heart Attack आणि Brain Hemorrhageशी काय संबंध?

Back to top button