Stock Market Opening : आशियाई बाजारातील तेजीचा मागोवा घेत तसेच बँकिंग, फायनान्सियल आणि ऑटो स्टॉक्सनी आघाडीच्या जोरावर आज बुधवारी (दि.२९) भारतीय शेअर बाजाराने तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २०० अंकांहून अधिक वाढून ५७,८०० वर गेला. तर निफ्टी १७ हजारांवर व्यवहार करत होता.
सेन्सेक्सवर एम अँड एम, एचसीएल टेक हे टॉप गेनर्स होते. हे शेअर्स सुमारे १ टक्क्याने वाढले. बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, टेक महिंद्रा, भारती एअरटेल आणि टाटा मोटर्स हे शेअर्सही वधारले आहेत. रिलायन्स, इंडसइंड बँक, एसबीआय आणि ॲक्सिस बँक हे शेअर्स घसरले. दरम्यान, वेदांता कंपनीने प्रति शेअर २०.५० रुपये पाचवा अंतरिम लाभांश जाहीर केल्यानंतर त्यांचे शेअर्स किरकोळ वाढले.
क्षेत्रीय निर्देशांकांत निफ्टी ऑटो ०.७९ टक्के आणि निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस ०.५२ टक्के वाढला. बँकिंग, एफएमसीजी, आयटी, मीडिया, मेटल, फार्मा आणि रिअल्टी स्टॉक्सही वाढीसह खुले झाले आहेत. दरम्यान, अदानी समूहाचे शेअर्स संमिश्र व्यवहार करत आहेत. (Stock Market Opening)
हे ही वाचा :