नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयाने नोकरी भरती जमीन प्रकरणात बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना या महिन्यात अटक करणार नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले आहे. ते २५ मार्चला याप्रकरणात सीबीआयच्या दिल्ली मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहतील, अशी माहिती तेजस्वी यांनी गुरुवारी न्यायालयात दिली. सीबीआयाने बजावलेला समन्स रद्द करण्याची मागणी करीत त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. वास्तव्य पाटण्यात असतांना दिल्लीत समन्स जारी करण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. पंरतु, हा समन्य रद्द करण्यास न्यायालयाने नकार दिला. (Tejashwi Yadav)
सीआरपीसीतील कलम १६० अन्वे केवळ स्थानिक अधिकार क्षेत्रातच नोटीस जारी केली जावू शकते. पंरतु, सीबीआयाने नोटीस जारी करीत दिल्लीत हजर राहण्याचे आदेश देत कायद्याचे उल्लंघन केले आहे, असे यादव यांनी न्यायालयात सांगितले होते. बिहारमध्ये विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्याने अधिवेशन संपेपर्यंतचा वेळ सीबीआयकडून मागून घेतला आहे. तीन वेळा सीबीआयकडे यासंदर्भात विनंती केली आहे. नवनियुक्त उपमुख्यमंत्री म्हणून विधानसभा अधिवेशनात उपस्थित राहणे कर्तव्य असल्याचे यादव म्हणाले होते.
हेही वाचा