हिजाब प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी होळी सुट्टीनंतर | पुढारी

हिजाब प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी होळी सुट्टीनंतर

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा; कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाची सुनावणी होळीच्या सुटीनंतर घेतली जाईल, असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी शुक्रवारी (दि.०३) स्पष्ट केले. येत्या ९ तारखेपासून कर्नाटकमध्ये परीक्षा सुरू होणार आहे. मुस्लिम मुलींना हिजाब घालायला परवानगी नसल्यामुळे त्यांना परीक्षेत सामील होता येणार नाही. या पार्श्वभूमीवर सदर प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी घ्यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडून करण्यात आली.

पण कर्नाटकातील या हिजाब प्रकरणावर त्वरित सुनावणी घेता येणार नाही. होळीच्या सुटीनंतर खंडपीठ स्थापन केले जाईल व याचिका निकालात काढली जाईल, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाला १२ मार्चपर्यंत होळीची सुटी असल्याने कामकाज बंद राहणार आहे.

हेही वाचा:

Back to top button