पुढारी ऑनलाइन डेस्क : TMC : लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकांसाठी आतापासूनच सर्व पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. यामध्ये काँग्रेसने देखील 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार केली आहे. तसेच भाजपला ब्रेक लावण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचे काम सुरू आहे, असे असताना ममता बॅनर्जींने नुकत्याच केलेल्या त्यांच्या वक्तव्याने सर्वच राजकीय पक्षांना मोठा धक्का लागला आहे. वाचा काय म्हणाल्या ममता बॅनर्जी…
ममता बॅनर्जी यांनी लोकसभा 2024 च्या निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षासोबत आघाडी करण्याच्या शक्यतेला नकार दिला आहे. ममत यांनी यावेळी एकला चलो रे चा नारा दिला आहे. ममता यांनी स्पष्ट केले आहे की ते पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुका लोकांच्या समर्थनाच्या आधारे स्वबळावर लढतील.
ममता म्हणाल्या, 2024 मध्ये ते तृणमूल काँग्रेस आणि जनता यांच्यातील आघाडी पाहतील. आम्ही कोणत्याही अन्य राजकीय पक्षासोबत जाणार नाही, आम्ही जनतेच्या समर्थनाच्या आधारे स्वबळावर निवडणूक लढवणार आहोत.
TMC : त्रिपुरा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. त्यानंतर त्रिपुरा विधानसभा निवडणुकांचा निकालाचा संदर्भ देत त्या म्हणाल्या की, जे सीपीआय(एम) किंवा काँग्रेसला मतदान करतात ते एकप्रकारे भाजपलाच मत देत आहे, हे सत्य या निवडणूक निकालांमधून समोर आले आहे. मला विश्वास आहे की, ज्यांना भाजपचा पराभव करायचा आहे ते आमच्या बाजूने मतदान करतील."
हे ही वाचा :