पुढारी ऑनलाईन डेस्क : २०० कोटींच्या मनी लाँड्रिंगप्रकरणातील सूत्रधार सुकेश चंद्रशेखरबरोबर असलेल्या संबंधांमुळे अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस वादाचा भोवर्यात सापडली आहे. या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तिला आरोपी बनविले आहे. दोघांचे नाते चव्हाट्यावर आल्यापासून सुकेश याने अनेकवेळा जॅकलिनवरील प्रेम व्यक्त केले आहे. आज व्हॅलेंटाईन डे निमित्त सुकेशला जॅकलिनची आठवण आली. न्यायालयात हजर करण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना त्याने व्हॅलेंटाईन डे निमित्त जॅकलिनला शुभेच्छा दिल्या. ( Sukesh-Jacqueline )
मनी लॉड्रिंगप्रकरणी आज ( दि. १४) सुकेशला न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी माध्यम प्रतिनिधींनी त्याला प्रश्न विचारला की, "जॅकलिनने तुझ्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांबाबत तुला काय म्हणायचे आहे?." यावर तो म्हणाला की, तिने माझ्यावर केलेल्या आरोपावर काहीच बोलायचे नाही. यानंतर सुकेशला जॅकलिनबरोबर असणार्या नात्याबद्दल विचारण्यात आले. यावर तो म्हणाले की, 'तुम्हीच माझ्या व्हॅलेंटाईन डेनिमित्त जॅकलिनला शुभेच्छा सांगा.'
काह दिवसांपासून मनी लाँड्रिंगप्रकरणी जॅकलिन न्यायालयात हजर राहिली होती. यावेळी माध्यमाशी बोलताना ती म्हणाले होती की, सुकेशने माझ्या भावनांशी खेळ करत माझं आयुष्य नरक बनवले आहे. सुकेशबरोबर असलेले नाते समोर आल्यानंतर जॅकलिनला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता सुकेशने तिला व्हॅलेंटाईन डेनिमित्त दिलेल्या शुभेच्छावर ती कोणती प्रतिक्रिया येणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :