तुर्कस्तानला तीव्र भूकंपाचा धक्का; १६ इमारती कोसळल्या, 5 ठार | पुढारी

तुर्कस्तानला तीव्र भूकंपाचा धक्का; १६ इमारती कोसळल्या, 5 ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुर्कस्तानमध्ये आज (दि.६) सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के बसले. यात १६ इमारती कोसळल्या असून ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने भूकंपाची तीव्रता ७.८ एवढी असल्याचे सांगितले. इमारती कोसळ्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

आग्नेय तुर्कस्तानमधील गझियानटेपजवळ ७.८ तीव्रतेचा भूकंप झाला, असे यूएस भूगर्भीय सेवेने सांगितले. नूरदगीपासून २३ किमी पूर्वेला भूकंपाचे केंद्रस्थान आहे. भूकंपात 5 लोकांचा मृत्यू तर 16 इमारती कोसळल्या असल्याचे सॅनलिउर्फाचे महापौर यांनी सांगितले. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये या प्रदेशातील अनेक शहरांमध्ये इमारती कोसळल्याचे दिसत आहे.

Back to top button