केंद्रीय अर्थसंकल्प ‘सर्वजनहिताय’ : देवेंद्र फडणवीस (Video) | पुढारी

केंद्रीय अर्थसंकल्प 'सर्वजनहिताय' : देवेंद्र फडणवीस (Video)

पुढारी ऑनलाईन:  अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ संसदेत सादर केला आहे. या अर्थसंकल्पात देशातील सर्व घटकांचा विचार करण्यात आला असून, हा अर्थसंकल्प ‘सर्वजनहिताय’ आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

माध्‍यमांशी बोलताना फडणवीस म्‍हणाले, विकसित भारताकडे जाणारा मार्ग यंदाच्‍या अर्थसंकल्पात आहे. या अर्थसंकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. यामधून राज्यांना पायाभूत गुंतवणूक करण्यास मदत मिळेल. तसेच पायाभूत सुविधाही मोठ्या प्रमाणात वाढतील, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला. .

आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आखलेल्या योजनांसाठी केंद्र सरकारचे कौतुकही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार, आरोग्य विभागात नवीन मनुष्यबळ निर्माण होईल. गाव पातळीवर सहकार मजबूत होण्यास मदत होणार आहे. साखर उद्योगाला दिलासा देणाऱ्या अनेक तरतुदी या अर्थसंकल्पात आहेत. आयकरातील सूट सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

Back to top button