Adoor Gopalakrishnan Resigns : ज्येष्ठ दिग्दर्शक अदूर गोपलकृष्णन यांनी दिला केरळा फिल्म इन्स्टीट्युटच्या अध्यक्षपदाचा राजीनामा | पुढारी

Adoor Gopalakrishnan Resigns : ज्येष्ठ दिग्दर्शक अदूर गोपलकृष्णन यांनी दिला केरळा फिल्म इन्स्टीट्युटच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

तिरुवनंतपुरम; पुढारी ऑनलाईन : मल्याळम चित्रपटसृष्टीतील दिग्गज तथा ज्येष्ठ दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांनी मंगळवारी आर के नारायणन फिल्म इन्स्टीट्युटचे ऑफ व्हिज्युअल सायन्स ॲन्ड आर्टस् (KRNNIVSA), कोट्टायम च्या अध्यक्षपदाचा राजीनाम दिला आहे. या कॅम्पसमध्ये उठलेल्या जातीय वादाच्या पार्श्वभूमीवर गोपालकृष्णन यांनी हा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. (Adoor Gopalakrishnan Resigns)

या इन्स्टीट्युटचे संचालक शंकर मोहन यांच्यावर जातीय भेदभावाचा विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी आरोप केल्याप्रकरणी काही दिवसांपुर्वी (२१ जाने) राजीनामा दिला होता. या प्रकरणावर शंकर मोहन यांची अदूर गोपालकृष्णन यांनी पाठराखण केली होती. आता याच प्रकरणातून त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी गोपालकृष्णन यांनी एक समिती गठीत केली होती. या समितीने शंकर मोहन यांच्यावरील आरोप पुर्णता निराधार आहेत, असे म्हटले नव्हते. (Adoor Gopalakrishnan Resigns)

अदूर यांनी आपल्या राजीनाम्यात शंकर यांच्यावरील आरोपांचा निषेध केला आहे. आपल्या राजीनाम्याच्या पत्रात अदूर म्हणाले की, हे निराधार आरोप म्हणजे चित्रपट उद्योगातील त्यांच्या चार दशकांच्या अनुकरणीय सेवेमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न आहे.

अधिक वाचा :

Back to top button