सावधान! ‘हे’ पाच Android Apps काही मिनिटांमध्‍येच तुमच्‍या बँक अकाऊंटवर मारतील डल्‍ला | पुढारी

सावधान! 'हे' पाच Android Apps काही मिनिटांमध्‍येच तुमच्‍या बँक अकाऊंटवर मारतील डल्‍ला

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : स्‍मार्ट फोन हा आपल्‍या जगण्‍यातील अविभाज्‍य भाग झाला आहे. त्‍याचे असंख्‍य फायदे आहेत. तसेच काही तोटेही आहेत. त्‍यामुळेच तुम्‍ही अँड्रॉईड फोन वापरत असाल तर काळजी घेणे अनिवार्य ठरते. आता वापरकर्त्यांच्या  बँक अकाऊंटवर डल्‍ला मारणार्‍या पाच अँड्रॉईड ॲप्‍सची ( Android Apps ) माहिती समोर आली आहे. हे ॲप तुमच्‍या फोन डेटासह बँक अकाऊंटवर डल्‍ला मारत असल्याचे स्प‍ष्ट झाले आहे. जाणून घेवूया या ॲप्‍सविषयी…

Android Apps माध्‍यमातून बँक अकाऊंटची माहिती हॅकर्सपर्यंत

एका रिपोर्टनुसार, अँड्रॉईड फोनवरील File Manager Small, My Finances Tracker, Zetter Authentication, Codice Fiscale 2022 आणि Recover Audio, Images & Videos या ॲप्समध्ये व्‍हायरस आढळले आहेत. अलिकडे एका मेलवेअर (व्हायरस) च्‍या सहाय्‍याने मोबाईल युजर्संना टार्गेट केले जात आहे. वरील ॲप्‍सच्‍या माध्‍यमातून हे मेलवेअर तुमच्‍या बँक अकाऊंटची माहिती हॅकर्सपर्यंत पोहचवते.

वरील ॲप्‍स तुम्‍ही इन्‍स्‍टॉल केले असतील तर तत्‍काळ डिलीट करा. कारण हेॲप्‍स तुमच्‍या बँक खात्‍याचे तपशील स्‍कॅमरला पाठवतात. त्‍यामुळे थेट तुमच्‍या बँक अकाऊंटमधील रक्‍कम गायब होवू शकते. वरील ॲप्‍स लाखो वापरकर्त्यांनी डाऊनलोड केली आहेत. त्‍यामुळे आर्थिक नुकसान करणार्‍या ॲपपासून सावध राहण्‍याची सूचनाही करण्‍यात येत आहे.

फोटोपासून पैसे पाठविण्‍यापर्यंतचे सर्व बाबी आपण स्‍मार्ट फोनवरच करत असतो. या व्‍यवहारांमुळे आपल्‍या बँकेतील सर्व माहिती फोनवर उपलब्‍ध असते. याचा फायदा नेहमी हॅकर्स घेत असतात. त्‍यामुळे कोणतेही ॲप डाउनलोड करण्यापूर्वी त्‍याची विश्‍वसनीयता तपासणे आवश्‍यक ठरते. मोबाईलवर कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याचे रेटिंग आणि इतर तपशील तपासणे आवश्‍यक आहे.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button