इजिप्तचे राष्ट्रपती अल-सिसी यांची आज पंतप्रधान मोदींसोबत महत्त्‍वपूर्ण बैठक | पुढारी

इजिप्तचे राष्ट्रपती अल-सिसी यांची आज पंतप्रधान मोदींसोबत महत्त्‍वपूर्ण बैठक

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांचे आज राष्ट्रपती भवनात आगमन झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात त्यांचे स्वागत केले. राष्ट्राध्यक्ष अल सिसी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. ज्यामध्ये व्यापार, संरक्षण यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी भारत दौऱ्यावर आले आहेत. ते उद्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये स्थानिक चलनात व्यवसाय करण्याबाबत चर्चा होऊ शकते. याशिवाय संरक्षणाबाबत सहकार्य वाढविण्यावरही चर्चा होऊ शकते. इजिप्तने भारताकडून अनेक संरक्षण उपकरणे आणि युद्ध विमाने खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे. दोन्ही देशांमध्‍ये युद्ध विमानांचे इंजिन एकत्र बनवण्‍यासाठीच्या सहकार्यावरही चर्चा होऊ शकते. बैठकीत दोन्ही देशांमध्ये सहा करार होण्याची शक्यता आहे.

Back to top button