धनुष्यबाण कोणाचे? निवडणूक आयोग सोमवारी देणार फैसला

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  धनुष्यबाण कोणाचे? ठाकरे गटाचे की शिंदे गटाचे, याचा फैसला अखेर येत्या सोमवारी होत आहे. निवडणूक आयोग या दिवशी आपला अंतिम निर्णय देणार आहे.

धनुष्यबाण चिन्हावर कोणाचा अधिकार, याबाबत निवडणूक आयोगात गेल्या दोन महिन्यांपासून सुनावणी सुरू आहे. 30 जानेवारीला कोणत्याही गटाचा युक्तिवाद होणार नाही. केवळ निर्णय दिला जाणार आहे. तत्पूर्वी, 30 तारखेपर्यंत दोन्ही गटांना गरजेनुसार लेखी म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून आता नव्याने कोणतेही लेखी उत्तर सादर केले जाणार नाही. शिंदे गट मात्र लेखी उत्तर सादर करणार आहे. निवडणूक आयोगाचा फैसला कोणाच्या पारड्यात जाणार, याबाबतची राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे.

 

Exit mobile version