महिलांचे कपडे धुण्‍याचा आदेश देणार्‍या न्‍यायाधीशांना न्‍यायदानास बंदी

महिलांचे कपडे धुण्‍याचा आदेश देणार्‍या न्‍यायाधीशांना न्‍यायदानास बंदी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : महिलांची छेडछाड प्रकरणातील संशयित आरोपीस जामीन मंजूर करताना मधुबनी जिल्‍ह्यातील झंझारपूर न्‍यायालयातील अतिरिक्‍त जिल्‍हा आणि सत्र न्‍यायाधीशांनी महिलांचे कपडे धुण्‍याचा आदेश दिला हाेता.  मात्र महिलांचे कपडे धुण्‍याचा आदेश दिल्‍याने पाटणा उच्‍च न्‍यायालयाने न्‍यायाधीश अविनाश कुमार यांना न्‍यायदान करण्‍यास बंदी घातली आहे.

अविनाश कुमार यांनी पुढील आदेशापर्यंत कोणत्‍याही खटल्‍याची सुनावणी घेवू नये, असा आदेश पाटणा उच्‍च न्‍यायालयाने दिला असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

काय आहे प्रकरण ?

महिलेच्‍या छेडछाड केल्‍याप्रकरणी संशयित आरोपीस अटक करण्‍यात आली होती. त्‍याने झंझारपूर  न्‍यायालयात जामिनासाठी अर्ज केला हाेता. यावरील सुनावणीवेळी न्‍यायाधीश अविनाश कुमार यांनी जामीन मंजूर करण्‍यासाठी एक अट ठेवली.

संशयित आरोपीने गावातील सर्व महिलांच्‍या कपडे मोफत धुवून द्‍यावेत. तसेच त्‍याला इस्‍त्रीही करावी, असा आदेश न्‍यायाधीश अविनाश कुमार यांनी दिला होता.

छेडछाड प्रकरणी झंझारपूर न्‍यायालयात सुनावणी झाली.

यावेळी संशयित आरोपीचे वकील म्‍हणाले की, संशयित आरोपीचे वय केवळ २०वर्ष आहे. तो समाजाची सेवा करण्‍यास तयार आहे. तसेच या प्रकरणातील तक्रारदारही तक्रार मागे घेणार आहेत, यासंदर्भातील प्रतिज्ञापत्रही जामीन अर्जासोबत जोडले आहे.

यावेळी संशयित आराेपीस जामीन मंजूर करताना  पुढील सहा महिने गावातील सर्व महिलांचे कपडे धुवावेत तसेच त्‍याला इस्‍त्रीही करावी, असा आदेश देत न्‍यायाधीश अविनाश कुमार यांनी दिला. हा आदेश बिहारमध्‍ये चर्चेचा विषय ठरला हाेता.

न्‍यायाधीश अविनाश कुमार यांचे चर्चेतील आदेश

१८ ऑगस्‍ट २०१९ रोजी अंधरामठ पोलीस ठाण्‍यातील मारहाणप्रकरणातील आरोपी नीरज कुमार साफी याला जामीन मंजूर करण्‍यात येत आहे. मात्र त्‍याने गावातील पाच गरीब व अशिक्षित महिला किंवा मुलींना साक्षर करण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत, असा आदेश न्‍यायाधीश अविनाश कुमार यांनी दिला हाेता.   या प्रकरणातील संशयित आरोपी बीएचा विद्‍यार्थी होता.

१ सप्‍टेंबर २०२१ रोजी पाण्‍यावरुन झालेल्‍या वादावरुन मारहाण प्रकरणातील संशयित आरोपी रुस्‍तम याला जामीन मंजूर झाला होता. यावेळी  रुस्‍तम यांनी घर परिसरातील गटार साफ करण्‍याचे आदेश न्‍यायाधीश अविनाश कुमार यांनी दिला हाेता.

हेही वाचलं का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news