बंगळूरमध्ये मेट्रोचा खांब कोसळून आई अन् बाळाचा करुण अंत | पुढारी

बंगळूरमध्ये मेट्रोचा खांब कोसळून आई अन् बाळाचा करुण अंत

बंगळूर : बंगळूरच्या नागवारात मंगळवारी मेट्रो प्रकल्पातील एक भलामोठा खांब अचानकपणे कोसळून त्यामध्ये दुचाकीवरून जाणार्‍या एका कुटुंबातील आई आणि तिच्या अडीच वर्षांच्या बाळाचा करुण अंत झाला. यात महिलेचा पती व एक मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता या घटनेचा तपास केला जात आहे.

या घटनेनंतर बंगळूर मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक अंजुम परवेज यांनी मेट्रोतर्फे पीडित कुटुंबीयांना 20 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली. ते म्हणाले, बांधकामात नेहमीच उच्च गुणवत्तेचे पालन केले जाते. घटनेची चौकशी सुरू आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य ती पावले उचलली जातील.

Back to top button