इंटरनेटवर इंग्रजीपेक्षा स्थानिक भाषांनाच सर्वाधिक पसंती | पुढारी

इंटरनेटवर इंग्रजीपेक्षा स्थानिक भाषांनाच सर्वाधिक पसंती

पुढारी वृत्तसेवा : इंटरनेटवर इंग्रजीपेक्षा भारतात स्थानिक भाषांना अधिक महत्त्व दिले जात असल्याचे चित्र आहे. ९० च्या दशकात इंटरेनटवर ८० टक्के मजकूर इंग्रजी भाषेत होता. आता तो ५३ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. स्थानिक भाषांचा मजकूर २० टक्क्यांहून आता ४७ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

Internet

 

‘फोर्ब्स’ च्या आकडेवारीनुसार, जगभरात २०२५ पर्यंत भाषांतर करणारा उद्योग सुमारे ७३.६ अब्ज डॉलर (६ लाख कोटी रुपये) पोहोचू शकतो. सध्या हा आकडा ५१.६ अब्ज डॉलर (४.२७ कोटी रुपये) आहे. भारतात सध्या याची उलाढाल ४ हजार १३९ कोटी रुपये इतकी आहे. २०१६ पासून ओटीटी प्लॅटफॉर्मपासूनच या उद्योगात डबिंग आणि उपशीर्षकांमुळे वाढ झाली आहे. ८३ टक्के भारतीय विदेशी भाषेतील चित्रपट स्वतःच्या भाषेत पाहण्यास पसंती देत असल्याचे न्यू मॉर्निंग कन्सल्ट डेटावरून समोर आले आहे.

Back to top button