‘विकुना’ प्राण्याची लोकर सर्वात महाग! | पुढारी

‘विकुना’ प्राण्याची लोकर सर्वात महाग!

नवी दिल्ली : हिवाळ्यात परिधान केल्या जाणार्‍या पोशाखाचा विचार करता भारतातील काश्मीरमधील पश्मिना बकरीच्या लोकरीचा वापर सर्वात मऊ आणि महागड्या पोशाखात केला जात असतो. मात्र, दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतराजीत आढळणार्‍या विकुना नावाच्या प्राण्याची लोकर जगात सर्वात महाग असते. त्याच्या लोकरीपासून बनवलेले कपडे जगातील सर्वात महागडे लोकरी कपडे आहेत.

विकुनाच्या लोकरीपासून बनविलेल्या पायमोजांची जोडीच सुमारे 80 हजार रुपयांची असते. तसेच या लोकरीच्या एका शर्टची किंमत 4 लाख 23 हजार रुपये व पँट 8 लाख 97 हजार रुपये असते. छोट्या उंटासारखे दिसणारे विकुना हे प्राणी नामशेष होत चाललेल्या प्राण्यांच्या यादीत समाविष्ट आहेत. त्यांची लोकर अतिशय मऊ, नाजूक आणि आरामदायक असते.

Back to top button