या गोष्टींचा मोह टाळा ..अन्यथा खावी लागेल जेलची हवा | पुढारी

या गोष्टींचा मोह टाळा ..अन्यथा खावी लागेल जेलची हवा

नवी दिल्ली : कोणत्याही गोष्टींची माहिती हवी असेल तर आपण सर्वप्रथम गुगलवर सर्च करतो. मात्र, अनेकदा गुगलवर नको त्या गोष्टी सर्च करणे महागात पडू शकते. गुगलवर काही गोष्टी सर्च केल्यास तुम्हाला जेलची हवा देखील खावी लागू शकते. त्या गोष्टी कोणत्या हे जाणून घेणे तुमच्यासाठी आत्यंतिक महत्त्वाचे आहे.

चाइल्ड पॉर्न

चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत सरकारने कठोर पावले उचलली आहेत. पॉस्को अॅक्ट २०१२ अंतर्गत चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत गुगलवर सर्च केल्यास ५ ते ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे चाइल्ड पोर्नबाबत कधीही गुगलवर सर्च करू नये.

बॉम्ब बनविणे

तुम्ही जर गुगलवर बॉम्ब बनवण्याची पद्धत सर्च करत असाल तर जेल होऊ शकते. याबाबत सर्च डेस्कटॉप अथवा पोर्टेबल डिव्हाइसच्या आयपी अॅड्रेसद्वारे ट्रॅक करून कारवाई केली जाते.

लैंगिक छळ

लैंगिक छळ वा इतर अत्याचारास बळी पडलेल्या व्यक्तीची खासगी माहिती शेअर करणे गंभीर गुन्हा आहे. अशा महिलेचे नाव, फोटो व इतर माहिती सोशल मीडियावर शेअर करणे टाळणे केव्हाही चांगलेच.

फिल्म पायरसी

तुम्ही जर फिल्म पायरसीचे काम करत असाल अथवा त्याबद्दल गुगलवर सर्च करत असल्यास तुम्हाला ३ वर्ष जेल होऊ शकते. एवढेच नव्हे तर यासोबत १० लाखांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो.

गर्भपात

गर्भपात कसा करावा, याबद्दल गुगलवर कधीही सर्च करू नका. गर्भपाताबाबत नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तुम्ही जर गर्भपात कसा करावा याबाबत सर्च करत असल्यास तुम्हाला हमरवास जेलची हवा खायला लागू शकते.

Back to top button