राजीव गांधी फाऊंडेशनला चीनमधून पैसा येतोच कसा? : अमित शहा | पुढारी

राजीव गांधी फाऊंडेशनला चीनमधून पैसा येतोच कसा? : अमित शहा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  एकीकडे चीनच्या नावाने ठणाणा आरडाओरड करायची आणि दुसरीकडे चीनकडून पैसा उकळायचा, असे चीनबाबत काँग्रेसचे दुटप्पी धोरण असल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून एक कोटी 38 लाख रुपये मिळतात कसे, असा संतप्त सवालही शहा यांनी केला.

संसदेबाहेर शहा बोलत होते. चीनने भारताच्या एक इंच जमिनीवरही कब्जा केलेला नाही, असेही शहा यांनी स्पष्ट केले. भारतीय जवानांनी पराक्रमाची पराकाष्ठा केली. चीन चकमकीवरून काँग्रेसने प्रश्नोत्तराचा तासही चालू न दिल्याबद्दल शहा यांनी तीव— नाराजी व्यक्त केली. राजीव गांधी फाऊंडेशनचा एफसीआर परवाना रद्द करण्यात आल्याबाबतचा एक प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात होता. काँग्रेसच्या या फाऊंडेशनला चीनकडून पैसे मिळतात. चीनने 2962 मध्ये काँग्रेसच्याच काळात भारताची हजारो एकर जमीन बळकावली होती, हे त्यांनी विसरू नये, असेही शहा म्हणाले.

Back to top button