आफताबचा तुरुंगात सुरू असतो स्वतःशीच बुद्धिबळाचा सामना | पुढारी

आफताबचा तुरुंगात सुरू असतो स्वतःशीच बुद्धिबळाचा सामना

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : श्रद्धा वालकर खून प्रकरणात अटकेत असलेला आफताब पूनावाला तुरुंगात एकटाच बुद्धिबळ खेळतो. दोन्ही बाजूंच्या चाली तोच रचतो व प्रत्युत्तरही तोच देतो. त्याच्यावर नजर ठेवणाऱ्या तुरुंग अधिकाऱ्यांनी तिहारमधला त्याचा दिनक्रम सांगितला आहे.

आफताबची पॉलिग्राफ व नार्को अशा दोन चाचण्या करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांत आफताबने दिलेल्या उत्तरांचे विश्लेषण केले जात आहे. दरम्यान, आफताबला तिहार तुरुंगात ठेवण्यात आले असून त्याच्यावर बारीक नजर ठेवली जात आहे. फुटकळ गुन्हे नावावर असलेले दोन गुन्हेगार आफताबच्या कोठडीत ठेवण्यात आले आहेत. तसेच कोठडीबाहेर दोन पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. तसेच त्याच्या कोठडीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे.

आफताबला आपल्या कृत्याचा जराही पश्चात्ताप नसल्याचे पॉलिग्राफ चाचणीच्या वेळी आढळून आले. कोठडीतही त्याचे वागणे शांतच आहे. तो कधी तरी कोठडीतल्या इतरांशी बोलतो, तेही अगदी मोजकेच. त्याचा बहुतेक वेळ बुद्धिबळ खेळण्यात जातो. तो एकटाच बुद्धिबळाचा पट मांडून बसतो व दोन्ही बाजूंच्या चाली रचतो व त्याला उत्तरादाखल चालीही खेळतो असे तुरुंगातीलअधिकाऱ्यांनी सांगितले.काही उत्तरांबद्दल संशयआफताबच्या नार्को चाचणीचे विश्लेषण करण्याचे काम सुरू आहे. ही चाचणी सुरळीत पार पडल्याचे सांगितले जात असले तरी काही प्रश्नांना त्याने दिलेली उत्तरे ही ठरवून दिल्यासारखी वाटतात, असा पोलिसांचा संशय आहे. या प्रश्नांबाबत वेगळी नियमित चौकशी करायची की कसे यावर आणखी सखोल विश्लेषणानंतरच ठरवले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

Back to top button