जय श्रीराम नव्हे, जय सियाराम म्हणा! | पुढारी

जय श्रीराम नव्हे, जय सियाराम म्हणा!

आगर मालवा : जय श्रीरामऐवजी जय सीयाराम म्हणा, असा सल्ला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला (आरएसएस) दिला आहे. संघवाले केवळ जय श्रीरामचा जयघोष करतात. ते सीयाराम म्हणत नाहीत. त्यांनी सीतामातेला बाजूला ठेवले आहे. ते सीतामातेची पूजा करत नाहीत. यावेळी राहुल गांधी यांनी जय श्रीराम आणि जय सीयाराम यामधील फरक सांगितला. भारत जोडो यात्रेचा शनिवारी दहा दिवस होता.

राहुल गांधी यावेळी भाजप आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केला. आगर मालवा येथे झालेल्या सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, जय सीयारामचा अर्थ आहे, प्रभू रामचंद्र आणि सीता माता एक आहे. आरएसएस सीयारामची संघटना नाही. संघटनेत कोणीच सीता नाही. प्रभू रामचंद्रांचा जप करताना सीतामातेचा जप करा. त्यांचा अपमान करू नका. मला ही माहिती एका पंडिताने दिली आहे.

राहुलबाबांचे ज्ञान मर्यादित

राहुलबाबांचे ज्ञान मर्यादित आहे. रामाची सुरुवात ‘श्री’ने होते आणि या शब्दाचा वापर भगवान विष्णू यांची पत्नी लक्ष्मी माता आणि सीतामातेसाठी केला जातो. त्यामुळे राहुल गांधी यांनी इतिहास योग्यपद्धतीने संपूर्णपणे वाचावा, असा सल्ला मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिला आहे.

Back to top button