देशातील पहिल्या खासगी रॉकेट लाँच पॅडची निर्मिती | पुढारी

देशातील पहिल्या खासगी रॉकेट लाँच पॅडची निर्मिती

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतात आतापर्यंत उपग्रह अथवा क्षेपणास्त्र लाँच करण्यासाठी श्रीहरिकोटा येथे सतीश धवन अवकाश केंद्रात केवळ दोन सरकारी लाँच पॅडचा वापर केला जातो. मात्र या स्थितीत आता बदल होणार आहे. आता देशातील खासगी लाँच पॅड आणि मिशन कंट्रोल सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. हे केंद्र स्पेस स्टार्टअप कंपनीने अग्निकूल कॉसमॉस तयार केले आहे. भारतीय अवकाश संशोधन केंद्राचे (इस्रो) प्रमुख एस. सोमनाथ यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, कंपनी अग्निबाण नावाचे रॉकेट निर्मिती करत आहे.

हे रॉकेट लवकरच खासगी लाँच पॅडवरून सोडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सतीश धवन केंद्रात हे लाँच पॅड ऑपरेट केले जाणार आहे. स्पेस स्टार्टअप कंपनीला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी (आयआयटी, मद्रास) सहकार्य करत आहे. इस्रोही या प्रकल्पाला मदत करत आहे. अग्निबाण रॉकेट दोन टप्प्यातील लाँच व्हेईकल आहे. हे रॉकेट जमिनीपासून 700 किलोमीटर उंचीवर 100 किलो वजनाचा भार घेऊन जाऊ शकते. पृथ्वीच्या खालच्या कक्षेत उपग्रह स्थापित करण्याची हा रॉकेटची क्षमता आहे.

जगातील पहिले सिंगल पीस 3 -डी प्रिंटेड हे रॉकेट इंजिन

जगातील पहिले सिंगल पीस 3 डी प्रिंटेड हे रॉकेट इंजिन आहे. त्यामुळे कोणताही पार्ट बसवण्याची गरज पडली नाही. 2021 च्या सुरुवातीला या रॉकेटची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. या प्रकल्पात अनेक बड्या उद्योगपतींनी गुंतवणूक केली आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी अग्निबाण रॉकेेट विकसित करण्यासाठी सुमारे 80. 43 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

Back to top button