Bihar Crime : अजब न्याय! ५ वर्षीय मुलीवर अत्याचार; शिक्षा फक्त ५ उठाबश्यांची, व्हिडिओ व्हायरल | पुढारी

Bihar Crime : अजब न्याय! ५ वर्षीय मुलीवर अत्याचार; शिक्षा फक्त ५ उठाबश्यांची, व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहार राज्यात एका आरोपीला एका गुन्हाअंतर्गत फक्त पाच उठ्याबश्यांची शिक्षा दिली आहे. तुम्हाला वाटत असेल एवढं काय? पण त्याने केलेला गुन्हा ऐकून आणि त्याला मिळालेली शिक्षा बघून तुम्हाला नक्कीच राग येईल आणि ज्यांनी शिक्षा सुनावली त्यांचाही. तर या आरोपीने आणि एका पाच वर्षीय मुलीवर अत्याचार केला आहे. ही घटना घडली आहे बिहारमधील (Bihar Crime) नवादा जिल्हयात. या शिक्षेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बिहार राज्यातील नवादा जिल्ह्यात एक धक्कादायक आणि न्यायाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नवादा जिल्ह्यातील अकबरपूर भागातील कनौज एका पाच वर्षाच्या चिमुरडीवर एकाने अत्याचार केला. या घटनेतील आरोपीच नाव अरुण पंडित असं सांगण्यात आलं आहे. तो गावात पोल्ट्री फार्म चालवायचा. त्याने त्या मुलीला चॉकलेटचं आमिष दाखवलं. तिला आपल्या पोल्ट्री फार्म मध्ये बोलवलं. तिथे तिच्यावर अत्याचार केले. तिने ही घटना आपल्या घरी सांगितली. तिच्या कुटुंबियांनी याप्रकरणी तात्काळ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची गोष्ट गावकऱ्यांसमोर बोलून दाखवली. पण गावकऱ्यांकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला.

Bihar Crime : फक्त पाच उठ्याबश्यांची शिक्षा

एवढी मोठी धक्कादायक घटना दाबण्याप्रकरणी एका माजी सरपंचाला जबाबदार ठरवण्यात आलं आहे. असं सांगण्यात आलं की, प्रकरण उघडकीस आल्यानंतर संशयित आरोपी या सरपंचाजवळ मदत मागण्यासाठी गेला. या माजी सरपंचाने पंचायत बोलवली. पंचायतीमध्ये जे काही झालं ते लाजीरवाणं होत. या आरोपीला फक्त पाच उठाबश्या काढायला सांगितलं आणि दोषमुक्त केलं. समाज काय म्हणेलं, प्रतिष्ठा याची भिती दाखवत पीडित मुलीच्या घरच्यांना शांत केलं. आणि हे प्रकरण दाबण्यात आलं. हा उठाबश्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलं होत आहे. या प्रकरणी बिहार सरकार आणि प्रशासनावर आक्षेप घेतला जात आहे. संताप व्यक्त केला जात आहे.

याप्रकरणी पोलिस अधीक्षक गौरव मंगला म्हणाले, या प्रकरणी आरोपीवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपीवर लवकरच कारवाई करण्यात येईल. पुढील तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा 

 

Back to top button