‘त्या’ नराधमाचा एन्काउंटर? चिमुरडीवर केला होता अत्याचार | पुढारी

‘त्या’ नराधमाचा एन्काउंटर? चिमुरडीवर केला होता अत्याचार

पुढारी ऑनलाईन डेस्क : तेलंगणा येथे चिमुरडीवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाचा एन्काउंटर केल्याची चर्चा आहे. त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला आहे. विशेष म्हणजे कालच तामिळनाडूच्या एका मंत्र्याने या घटनेतील संशयिताचा एन्काऊंटर करू असे वक्तव्य केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याचा मृतदेह मिळाला आहे.

तेलंगणातील सैदाबाद भागात ९ सप्टेंबर रोजी ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती.

या प्रकरणातील फरार आरोपीचा मृतदेह घानपूर भागात रेल्वे रुळावर आढळला आहे.

मृताच्या शरीरावर गोंदवलेल्या चिन्हांच्या आधारे त्याची ओळख पटवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे फरार आरोपीला अटक करून त्याचं एन्काऊंटर करू त्याला सोडण्याचा प्रश्नच येत नाही,

असे तेलंगणाचे कामगार मंत्री मल्ला रेड्डी बुधवारी म्हणाले होते.

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरोपीचा मृतदेह सापडला आहे. आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करताना ट्रेनसमोर उडी मारली असे पोलिसांनी सांगितले.

तेलंगणच्या पोलिस महासंचालकांनीही आरोपीच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे.

नराधमाने चिमुरडीचा केला घात

हैदराबादच्या सैदाबादमध्ये गुरुवारी, ९ सप्टेंबर रोजी ही घटना घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय आरोपी राजू हा पीडितेचा शेजारी होता.

त्याने मुलीशी मैत्री केली होती. मुलगी घरातून बेपत्ता झाल्याच्या काही तासांनंतर आरोपीच्या घरात मृतावस्थेत ती आढळली होती.

तेव्हापासून, पोलिसांनी तयार केलेल्या तब्बल नऊ विशेष टीम त्याचा शोध घेत होत्या.

त्याची ओळख पटवणं सोपं व्हावं, यासाठी हैदराबाद पोलिसांनी त्या व्यक्तीचा फोटो आणि इतर माहिती जाहीर केली होती.

बुधवारी जारी केलेल्या निवेदनात हैदराबादचे पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी आरोपीची ओळख पटवून त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केले होते. त्यानंतर त्या नराधमाचा एन्काउंटर झाल्याची चर्चा आहे.

हेही वाचा : 

Back to top button