ढारी ऑनलाईन डेस्क : श्रद्धा खून प्रकरणानंतर मानवी कृत्याला काळीमा फासणारं आणखी एक प्रकरण उघडकीस आलं आहे. प्रियकराने आपल्या प्रेमिकीचे सहा तुकडे करत विहिरीत फेकून दिले. ही धक्कादायक घटना उत्तरप्रदेशमधील आजमगढमध्ये घडली आहे. सहा दिवसांपूर्वी अहरौला पोलिस स्टेशन परिसरातील गौरीपुरा गावाच्या रस्त्याजवळील विहीरीत एका महिलेचं धड आणि काही तुकडे सापडले (Azamgrah Murder ). त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. आराधना, असे या खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर प्रिन्स यादव असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. वाचा सविस्तर बातमी.
पोलिस अधीक्षक अनुराग आर्य यांनी रविवारी (दि.२०) सांगितले की, विहिरीत सापडलेले शव हे आराधना नावाच्या महिलेचं आहे. या महिलेवर प्रिन्स हा प्रेम करत होता. या महिलेचं लग्न दुसऱ्या एका व्यक्तीशी झालं होतं. तिच्या लग्नानंतर तो निराश झाला. त्यानंतर त्याने ठरवलं की, आराधनाचा काटा काढायचा. पोलिसांनी असेही सांगितले की, प्रिन्सचे आई, वडिल, बहीण, मामा, मामी, मामे भाऊ व मामे भावाची पत्नी आराधनाचा खून करण्यात सहभागी होते.
पोलिसांनी आरोपीला शनिवारी (१९ नोव्हेंबर) रोजी अटक केली. त्यानंतर पोलिस रविवारी (२० नोव्हेंबर) रोजी या खूनप्रकरणातील इतर संशयितांना अटक करण्यासाठी गेले. तेव्हा त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात मुख्य आरोपी प्रिन्स हा जखमी झाला. पोलिसांनी खून करण्यासाठी वापरलं गेलेलं लाकडी साहित्य, पिस्तुल, काडतूस आणि इतर साहित्य जप्त केले आहे. आराधनाचा खून केल्यानंतर प्रिन्सच्या मामाचा मुलगा सर्वेश पसार झाला आहे. पोलिसांनी सर्वेशला पकडून देण्यासाठी २५ हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.
घटना अशी की, १६ नोव्हेंबर रोजी गौरीपुरा गावाच्या रस्त्याजवळ विहिरीत मानवी शरीराचे तुकडे सापडले. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पाच पथक तयार केली. पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले की खून झालेल्या महिलेचं नाव आराधना आहे. आणि ती शिनाख्त जिल्ह्यातील इसहाकपूर गावातील केदार प्रजापती यांची मुलगी आहे. हळूहळू खुनाचे धागे उलगडत गेले. या घटनेत प्रिन्स यादवचे नाव समोर आले. प्रिन्ससोबत आराधनाचे प्रेमसंबध होते. तिचे फेब्रुवारी २०२२ मध्ये दुसऱ्या मुलाशी लग्न झाले. आराधनाच्या विवाहाचे समजल्यानंतर प्रिन्स शारजाहमधून गावी परत आला. परत आल्यानंतर त्याने आराधनाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण तिच्याशी संवाद करता आला नाही.
प्रिन्सने आपल्या प्रेमसंबंधाची व आराधनाच्या लग्नाबद्दल आपल्या आई वडिलांना कल्पना दिली. प्रिन्सने आराधनाच्या खुनाचा कट रचला. यात त्याच्या आई-बाबांनी साथ देण्याचं ठरवलं. त्यानंतर त्याने आपल्या मामाच्या कुटुंबालाही या कटात सामील करून घेतले. त्याने तिला भेटण्यासाठी राजी केले. कटाप्रमाणे प्रिन्सच्या मामाचा मुलगा सर्वेशला सोबत घेऊन नऊ नोव्हेंबरला आराधनाला तिच्या घरातून भैरव धामला फिरायला घेऊन गेला. त्यानंतर त्याने आराधनाला एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला. तिथून तिला आपल्या मामाच्या गावातील एका ऊसात नेले. तिथे प्रिन्स आणि सर्वेशने तिचा गळा दाबून खून केला. खुनानंतर आराधनाच्या शरीराचे तुकडे केले. त्यानंतर ते तुकडे पॉलिथॉनमध्ये पॅक करून गौरीपुरा गावाजवळ एका विहिरीत टाकले. सहा दिवसांपूर्वी अहरौला पोलिस स्टेशन परिसरातील गौरीपुरा गावाच्या रस्त्याजवळील विहिरीत एका महिलेचं धड आणि काही तुकडे सापडले (Azamgrah Murder). त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
हेही वाचा