गुजरात मंत्रिमंडळ विस्तार: जुन्या मंत्र्यांना मिळणार नारळ | पुढारी

गुजरात मंत्रिमंडळ विस्तार: जुन्या मंत्र्यांना मिळणार नारळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरात च्या मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना बदलून मंत्रिमंडळ विस्तार करताना त्यांच्याजागी नियुक्त केलेल्या भूपेंद्र पटेल यांनी रुपाणी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना हटविण्याचा निर्णय घेतला आहे. आज मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता असून सध्या रुपाणी यांच्या निवासस्थानी सर्व आमदार पोहोचले आहेत.

पटेल यांच्या या निर्णयामुळे अनेक नेते नाखूश आहेत. मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार असल्याने दुपारी होणारा शपथविधी सोहळा सायंकाळपर्यंत टाळला आहे.

रुपाणी, नितीन पटेल यांच्यासमवेत अनेक नेते नाराज

भूपेंद्र पटेल यांनी मंत्रिमंडळात नव्या भिडूंना समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानंतर मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि ज्येष्ठ मंत्री भूपेंद्र सिंह चुडासमा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना केवळ मंत्रिपद देऊन मंत्रिमंडळात सहभागी करून घेतले जाण्याची शक्यता आहे. पटेल यांच्या या निर्णयामुळे अंतर्गत वाद वाढण्याची चिन्हे आहेत.

रुपाणी यांच्या घरी आमदार

भाजपच्या अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ९० टक्के अधिक मंत्र्यांना घरी बसविण्यावर विचार केला जात आहे.

केवळ एक किंवा दोन जुने मंत्री सहभागी होतील. या भूमिकेवरून पक्षात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

अनेक विधायक रुपाणी यांच्या घरी पोहोचले आहेत. यात ईश्वर पटेल, ईश्वर परमार, बच्चू खाबड, वासन आहीर, योगेश पटेल यांचा समावेश आहे.

आज नवे मंत्री शपथ घेतील

भाजपचे प्रवक्ते यमल व्यास म्हणाले, अजून नव्या मंत्र्यांची नावे घोषित झाली नाहीत. हे मंत्री दुपारी गांधीनगरमध्ये येतील. त्यानंतर शपथविधी होईल.

असे असेल मत्रिमंडळ

गुजरात मंत्रिमंडळ विस्तार करत असताना बहुतांश नवे चेहरे असतील. तरुण नेत्यांना अनेकांना आपली जागा खाली करावी लागेल अशी चिन्हे असतात.

तसेच मंत्रिमंडळात महिलांनाही स्थान मिळू शकते. जातीय समीकरणांची तडजोड करण्यासाठी स्वच्छ चेहरा देण्यासाठी रणनीती आखली जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button