ग्रामस्थांच्या हल्ल्यात 10 वर्षीय मुलीचा मृत्यू | पुढारी

ग्रामस्थांच्या हल्ल्यात 10 वर्षीय मुलीचा मृत्यू

चेन्नई :  तामिळनाडूच्या पुडुकोट्टाई जिल्ह्यात किल्लानूर गावात ग्रामस्थांनी सहाजणांच्या कुटुंबाचा पाठलाग करून त्यांना बेदम मारहाण केली. यात कुटुंबातील अवघ्या 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. ग्रामस्थांनी या कुटुंबावर मंदिरातून वस्तू चोरल्याचा आरोप केला. जमावाने कुटुंबाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

14 नोव्हेंबर रोजी मारहाणीची घटना घडली. त्यानंतर यातील मुलीला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर बुधवारी (दि. 16) तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या कुटुंबाची गावकर्‍यांच्या तावडीतून सुटका केली. मात्र, त्या चिमुरडीचे प्राण वाचले नाहीत. दरम्यान, मंदिरातील चोरीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Back to top button