आंध्र प्रदेशात साधूच्या वेषातील तरुणाचा टीडीपी नेत्यावर हल्ला | पुढारी

आंध्र प्रदेशात साधूच्या वेषातील तरुणाचा टीडीपी नेत्यावर हल्ला

काकीनाडा;  वृत्तसंस्था :  आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यात तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) नेते पोलनाती शेषगिरी राव यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. एक तरुण साधूच्या वेशात भिक्षा मागण्याच्या बहाण्याने आला आणि त्याने राव यांच्यावर हल्ला केला. यामध्ये राव गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा सर्व प्रकार राव यांच्या घरातील सीसीटीव्हीमध्ये पाहण्यास मिळाला.

राव आपल्या घराच्या गेट समोर उभे आहेत आणि साधूला ते भिक्षा देत आहेत. त्याचदरम्यान तो तरुण आपल्या शालीत लपवलेले धारधार शस्त्र काढतो आणि राव यांच्यावर दोन वेळा हल्ला करतो. त्यानंतर राव जखमी होऊन खाली कोसळतात. त्यानंतर तो तरुण पळून जातो. त्याचवेळी हा प्रकार पाहिल्यानंतर एक महिला मोठ्याने ओरडते, असे क्लिपमध्ये दिसत आहे. आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. याप्रकरणी टीडीपीने रस्ते मंत्री दादी शेट्टी यांच्या समर्थकांना दोषी ठरवले आहे.

Back to top button