Kashmiri Pandits : दहशतीच्या वातावरणात अखेरच्या काश्मिरी पंडित महिलेने सोडले काश्मीर खोरे

Kashmiri Pandits : दहशतीच्या वातावरणात अखेरच्या काश्मिरी पंडित महिलेने सोडले काश्मीर खोरे
Published on
Updated on

श्रीनगर; पुढारी ऑनलाईन : डॉली कुमारी या शोपियान जिल्ह्यातील चौधरीगुंड गावातील शेवटच्या काश्मिरी पंडित (Kashmiri Pandits) होत्या. गुरुवारी (दि.२८) सायंकाळी त्यांनीही काश्मीर खोरे सोडले आहे. काश्मीरमधील टार्गेट किलिंगनंतर सात कुटुंबांनी शांतपणे गावातून जम्मूला गेली. गाव सोडताना डॉली म्हणाली, 'मी एकटी काय करू शकते, इथे भीतीचे वातावरण आहे'.

डॉली यांनी सांगितले की, ती धाडस करुन राहण्याचा प्रयत्न करत होती. इतर कुटुंबांनी गाव सोडल्यानंतरही मी राहण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसात परिस्थिती सामान्य होईल, असे वाटत होते. कोणाला त्यांचे स्वत:चे घर सोडू वाटते, प्रत्येकाला आपले घर हवं असतं. पण, आता मला माझं घर सोडताना खूप दु:ख होत आहे. (Kashmiri Pandits)

१५ ऑक्टोबर रोजी चौधरीगुंड येथे काश्मिरी पंडित पूरण कृष्ण भट्ट यांची हत्या करण्यात आली होती. त्याच्या दोन महिन्यांपूर्वी शोपियान मधील छोटीगम गावातील सफरचंदाच्या बागेत एका काश्मिरी पंडिताची हत्या करण्यात आली होती. डॉली म्हणाल्या, मला सांगा, जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा तुम्ही घाबरणार नाही. पंडितांची घरांना आता कुलूपे लागली आहेत. ते त्यांचे सफरचंदाचे उत्पादन विकण्यासाठी सुद्धा थांबले नाहीत. त्यांनी गावातील सफरचंदांच्या हजारो पेट्या शेजाऱ्यांना बाजारात विकण्यास सांगितले व त्यांनी रिकाम्या हाताने खोरे सोडले. (Kashmiri Pandits)

चौधरीगुंड आणि छोटेपोरा गावात 11 पंडित कुटुंबे होती. आता सर्वजण जम्मूला गेले आहेत. गुलाम हसन या गावकऱ्याने डॉली यांना गाव सोडण्यास सांगितले होते. गुलाम यांनीच डॉली यांच्या घराला कुंपण घालण्यास मदत केली होती. गुलाम म्हणाले, पूरण कृष्ण हा या गावातील चांगला माणूस होता. त्याची हत्या झाली याचे खूप दुःख वाटते. नुकत्याच झालेल्या हत्येनंतर पंडितांना असुरक्षित वाटत आहे. दहशतवाद आणि अशांततेच्या काळातही यापैकी एकाही कुटुंबाने स्थलांतर केले नव्हते. (Kashmiri Pandits)

मात्र, पंडित कुटुंबे भीतीपोटी गाव सोडून जात असल्याचे जिल्हा प्रशासनाने नाकारले. हा अहवाल निराधार असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. प्रशासनाने चोख आणि कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. अनेक लोक पिके कापणीनंतर आणि हिवाळ्यात जिल्ह्यातून स्थलांतर करतात.

गावातील माजी सैनिक गुलाम हसन वागे यांनी सांगितले की, नुकत्याच झालेल्या टार्गेट किलिंगनंतर पंडित घाबरून घराबाहेर पडले आहेत. सुमारे ६००० काश्मिरी पंडित कर्मचारी टार्गेट किलिंगच्या भीतीने त्यांच्या कार्यालयात जात नाहीत. केंद्राच्या विशेष रोजगार योजनेंतर्गत त्यांना काश्मीर खोऱ्यात नोकरी मिळाली होती. हे सर्वजण आता जम्मूला बदली करण्याची मागणी करत आहेत.

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news