हजाबविरोधी तरुणींनी इराण सरकार विरोधात उचलल्या बंदुका | पुढारी

हजाबविरोधी तरुणींनी इराण सरकार विरोधात उचलल्या बंदुका

तेहरान ः वृत्तसंस्था
इराणमध्ये हिजाबविरोधी तरुणींनी हुकूमशाही सरकारविरोधात आरपारची लढाई छेडली आहे. पोलिस आणि लष्कराच्या दडपशाहीनंतर हिजाबविरोधी अनेक तरुणी इराणच्या पश्चिम भागातलि कुर्दिस्तानमध्ये पोहोचल्या आहेत. याठिकाणी तरुणींना लष्करी प्रशिक्षण दिले जात असून तरुणींनी सरकारविरोधात बंदुकी हातात घेत आहे. कुर्दिस्तानमधील बंडखोर इराण सरकारच्या विरोधात आहे. हिजाबविरोधातील तरुणी कुर्दिस्तानमध्ये पोहोचल्यानंतर इराण सरकारचा तीळपापड झाला होता. त्यानंतर इराणच्या लष्कराने कुर्दिस्तानात मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षाव केला होता.

सनानदाज आणि सकीज या शहरातून हिजाबविरोधी तरुणी इराण लष्काराच्या हातावर तुरी देऊन इराकच्या सीमेवर जात आहेत.सुमारे 10 ते 12 तासांच्या प्रवाशात माझी जीव टांगणीला लागला होता. इराणी सैनिकाने मला पाहिले असते त्याने गोळीच मारली असती पण त्याची मला भीती नव्हती, असे एका रेजान नावाच्या तरुणीने सांगितले. पोलिसांनी मला अमानुषरित्या मारहाण केली. त्यानंतर मी कुर्दिस्तानला जाण्याचे ठरविले. माझ्या बहिणींना स्वातंत्र्य मिळवून देईन, असे मी आईला वचन दिले आहे. त्यामुळेच मी कुर्दिस्तानला आले आहे. इराणी मुली हुकूमशाही सरकारच्या दबावाखाली कसे आयुष्य घालवत आहेत, हे मी पाहिले आहे. आता त्यांना स्वातंत्र्य मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, असे 20 वर्षीय सकीनाने सांगितले.

आता मागे हटण्याचा प्रश्नच नाही

हिजाबविरोधी तरुणींना इराण सरकारकडून अत्यंत वाईट पद्धतीने वागणूक दिली जात आहे. इराणमधून आलेल्या तरुणी आमच्या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. आता युद्ध छेडले आहे, त्यामुळे मागे हटण्याचा प्रश्नच नसल्याचे कुर्दिस्तान फ्रीडम पार्टीचे जनरल हुसैन याजदनपना यांनी सांगितले.

Back to top button